Skip to main content

Posts

मराठी चॅनेल्समधील स्थित्यंतर

पुन्हा मराठीच का ? राष्ट्रीय चॅनलमध्ये गेलेला मराठी पत्रकार पुन्हा मराठीकडे वळला तर हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र गेल्या काही वर्षात बदललेली परिस्थिती पाहता या प्रश्नाचं उत्तर मराठी चॅनल्स ना मिलणारं ग्लॅमर हे उत्तर असू शकतं. माझी सुरवातच मराठी चॅनलपासून झाली, निर्विवादपणे मराठी न्यूज चॅनल्स चा बादशहा म्हणूव ओळखल्या गेलेल्या ईटीव्ही मराठीपासून कारकिर्द सुरू करत असताना नॅशनल हिंदी चॅनल्स ग्लॅमर अनेकांना मी खुणावताना पाहीलं होतं. ही परिस्थिती ख-या अर्थानं बदलली 24 तास बातम्या देणा-या मराठी न्यूज चॅनल्सनी . स्टारमाझा, आय.बी.एन.लोकमत आणि झी24 तास ने ख-या अर्थानं मराठी बातम्या पाहणा-या दर्शकाला वेगळंपण जाणवून देण्याचं काम केलं. मात्र अजूनही मराठी न्यूज चॅनल्स पौगंडावस्थेत आहेत आणि त्यांना करण्यासारखं बरंच काही आहे. मात्र 24 तास बातम्या देणा-या या न्यूज चॅनल्सनी ईटीव्ही न्यूज ची पोकळी कधीच जाणवू दिली नाही. साधरणपणे 2002 नंतर हिंदी न्यूज चॅनेल्समध्ये सुरू झालेली स्पर्धा ही आता मराठी न्यूज चॅनेल्समध्ये बघायला मिळत आहे.  वेगवान बातम्या, चांगल्या बातम्या तसंच हिंदी चॅनेल्सचा प्...

वारी भाग - 1

वारी सुरू झालीय. स्टार माझामध्ये असताना दोन वर्ष वारी कव्हर केली. गेली दोन-तीन वर्ष काही जायला मिळालं नाही. ‘ वारी ’ हे दोन शब्द आजही ऐकले की नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. शून्य माहिती होती वारीबद्दल, पण वारी हा विषय असा आहे की तो पाठांतर आणि रिसर्च करण्यापेक्षा स्वत अनुभवून लोकांपर्यत पोचवणं जास्त सोपं असतं. अनेक लोकं स्वतला वारी स्पेशल तज्ञ म्हणवतात, पण वारीतला खरा तज्ञ असतो तो मैलो-न-मैल चालणारा वारकरी, जो कधीच काहीच बोलत नाही. शहरात राहणा-या मंडळींचं वारीबद्दलचं ज्ञान म्हणजे खेडड्यातल्या गावंढळ लोकांची एक यात्रा एवढंच असतं. मात्र ही यात्रा नसून जीवन म्हणजे काय हे देहू-आळंदी ते पंढरपूर या प्रवासादरम्यान समजवून सांगणारा प्रवास असतो. वारी बदलत चालली आहे. शेतक-यांबरोबर हायप्रोफाईल लोकंही वारीत सहभागी होतात, अविनाश भोसले आपल्या लव्याजम्यासोबत वारीत चालतात, आय.टी.वाले , विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी वारीत जेवढं जमेल तेवढं अंतर पार करताना दिसतात. कित्येक विदेशी मंडळीही दिंड्या,पताका घेऊन चालताना दिसतात. एरवी ज्यांच्याकडे लोकं पहातही नाही अशी मंडळी वारीतले हिरो असतात. प्...

के.सी.आणि मी

कॉलेज संपल्यावर काय करायचं या विवंचनेत असताना माझ्या शाळेतला मित्र जयेश जोशी मुळे मला दिव्यज्ञान प्राप्त झालं की मराठीमध्ये पत्रकारितेचा कोर्स उपलब्ध आहे. क्षणाचाही विलंब न करता मी कोर्स साठी प्रवेश घेऊन टाकला. ख-या अर्थाने कॉलेजचे दिवस मला अनुभवायला मिळाले ते याच काळात. मी आणि जयेशने कॉलेजच्या अधिकृत वेळेचा सदुपयोग मरीन ड्राईव्ह वर टाईमपास करण्यात किंवा “ प्लॅनेट M” मध्ये गाणी ऐकण्यात घालवलाय. नंतर जयेशचा सिलॅबस संपला आणि तो कॉलेजला फारसा येईनासा झाला. मग माझी लढाई(टाईमपासची) मलाच लढावी लागली. या काळात जरा गांभीर्याने लेक्चरला बसायला लागलो , पण गांभीर्य अगदी काही तासातच ओसरलं आणि त्या अभ्यासाचा कंटाळा येऊ लागला.  अभ्यासाचा कंटाळा येत असला तरी वर्गामध्ये जरा मजा यायची , आमच्या बॅचला मुलांचं प्रमाण मुलींच्या तुलनेत 30 : 3 असं होतं. अभ्यास हा धर्म आहे आणि या धर्माचं प्रत्येकानं पालन केलंच पाहीजे अशी धारणा केलेल्या अनेक मुली वर्गामध्ये होत्या , त्यांच्याकडे बघितलं की उगाच दडपण यायचं. मला आज कॉलेजमध्ये काय शिकलो हे अजिबात आठवत नाहीये , पण या कॉलेजने माझ्यातल्या कवीला नक्की जाग...

शाळा (भाग2)

आमची शाळा मध्यमवर्गीयांची होती, यातही बरेच विद्यार्थी असे होते ज्यांचे पालक जीवतोड मेहनत करून मिळेल त्यातल्या पैशातून कसंही करून मुलाला शिकवायचंच या जिद्दीने मुलांना शिकवणारे होते. अशा मुलांना अगदी नाममात्र म्हणजे 5 किंवा 10 रूपये फी पण परवडायची नाही त्यांच्याकडून सहलीसाठी पैसे कुठून मागायचे हा पण एक मोठा प्रश्नच होता. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फारसा कोणी प्रयत्नच केला नाही. जवळपास दिड वर्षापूर्वी शाळेत आमच्याबरोबर असलेले जे-जे जमतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. एकमेकांची विचारपूस करत असताना प्रत्येकजण आता काय करतोय हे कळत होतं. दहावीपर्यंत नुसता उंडगत फिरणारा आनंद संचेती आता इंजनिअर झाला, फॉरेनला गेला, नापास झाल्होयामुळे आमच्या बरोबर आलेला आणि नंतर आमच्याच बरोबरचा झालेला अमित कदम स्व : तचं दुकान चालवतो (आणि ते ही अतिशय उत्तम पद्धतीने) सायन्स करून कॉलेजमधून बाहेर पडलेला निलेश पाटील केमिकल चा प्लॅन्ट एकट्याच्या जीवावर उभा करू शकतो. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त रस असलेला प्रीतम परब एक मल्टीनॅशनल बँकेत मोठ्या पदावर आहे. जयेश जोशी स्वतची इव्हेन्ट मॅनेज...

खाणा-याने खात सुटावे....

ईटीव्हीत जगणं सुसह्य करणा-या काही निवडक गोष्टी होत्या. त्यामध्ये खाणं ही सगळ्यात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट होती. हैद्राबादची ओळख ही तिथल्या बिर्याणी मुळे आहे. आम्ही ज्या ठिकाणी रहायचो (दिलसुखनगर भागात) तिथे वडापावच्या गाड्यांप्रमाणे बिर्याणीची छोटी दुकानं असायची. फक्त दिलसुखनगरच नाही तर जवळपास संपूर्ण हैद्राबादमध्ये अशा पद्धतीची दुकानं दिसून यायची. एका बिर्याणीमध्ये दोन जणांचं काम भागायचं. 70 ते 80 रूपयांमध्ये एका वेळचं पूर्ण जेवण बिर्याणीमुळे होऊन जायचं. अमित जोशीला फिरण्याची बरीच आवड होती. एकदा अमित एकटाच सिकंदराबाद भागात गेला होता तिथं “ अल्फा ” नावाच्या हॉटेलमधली बिर्याणी त्याला एवढी आवडली की दोन माणसांची बिर्याणी त्याने एक ब्रेक घेऊन संपवून टाकली. (बिर्याणी एका माणसानं संपवणं ही अशक्यप्राय गोष्ट होती) सांगायचं तात्पर्य की बिर्याणीची चव ही आयुष्यभर स्मरणात राहील अशी होती. सकाळी नाश्त्यासाठी पुन्हा छोट्या दुकानांचा आधार घ्यावा लागयचा. रस्त्याच्या कडेला अनेक स्नॅक्स कॉर्नर दियायचे. इथे इडली, डोसा, पासून टॉमेटो भात बिसिबेळी हुळ्ळीअन्ना( मला या पदार्थाचं नाव ऐकूनच तो न खाण्याच...

ईटीव्ही नावाचा मॅरेज ब्युरो.

ईटीव्हीत असताना अनेक अनुभव आले...चांगले कमी आणि वाईट जास्त होते. सगळ्यात महत्वाचं तत्व जे मी ईटीव्हीतून किंवा आत्तापर्यंतच्या अनुभवातून शिकलो ते म्हणजे काहीच निश्चित आणि शाश्वत नसतं, आज एखादा माणूस वर दिसतो तो दुस-या दिवशी असा खाली आपटेल की कोणी विचारही करू शकत नाही. त्यामुळे झटपट वर जाण्याच्या नादात लोकांकडून फक्त शिव्याशाप खाणारे अनेकजण मी जवळून बघितलेत ( सोप्या समजणा-या भाषेत यांना चाटुकारिता करणारे म्हणतात) आपली मतं दुस-याला पटली नाहीत तर ती दुस-यावर लादण्यापेक्षा शांत बसावं हे मी या काळातच शिकलो.... ईटीव्हीला मिनी भारत म्हटलं जायचं...संपूर्ण भारतातून इथे लोकं काम करत होते, हैद्राबादमध्ये रहात होते. भारताप्रमाणेच इथंही लोकांमध्ये एकोपा होता, भांडणं होती, आणि कंपूगिरीही होती. प्रत्येकाने आपापला गट बनवला होता तसा तो माझाही होता. मी ,सचिन फुलपगारे , आशिष चांदोरकर, अमित जोशी आणि सचिन देशपांडे एका घरात रहायचो, पण भांडणंही जबरदस्त व्हायची...अमित जोशी पातेलंभर चहा करायचा (अमितसमोर हा विषय काढला तर तो अजूनही वैतागतो) कुकरभर खिचडी करायचा आणि नंतर सगळं एकतर स्वतच खायचा किंवा फेकून द्यायचा....

सुरूवात

नक्की दिवस आठवत नाही मात्र जवळपास 2002-2003 मध्ये मी ईटीव्हीमध्ये कामाला सुरवात केली. पहिली नोकरी, ती ही राज्याबाहेरची ,मुलगा एकटा बाहर जाणार कसा राहणार या काळजीने आईबाबा काहीसे चिंतेमध्ये होते. पण माझ्या मनात भीती नाही हे पाहून त्यांच्या मनातली भीती काहीशी कमी झाली होती. ही परिस्थिती फक्त माझ्या आईबाबांची होती असं नाही, नंतर आलेल्या अमित जोशी किंवा बाकीच्यांच्या घरीही जवळपास अशीच परिस्थिती होती. कामाचा कुठेही अनुभव नव्हता, पाटी कोरी होती असा परिस्थितीत हैद्राबादचं रामोजी फिल्म सिटीमधलं ईटीव्हीचं ऑफीस बघितलं की भांबावल्यासारखं व्हायचं. नवीन होतो चुका व्हायच्याच होत्या. त्याकाळी अशा चुका केल्या ज्या मागे वळून पाहताना वाटतं की अतिशय शुल्लक होत्या. पण या सगळ्या चुका अनुभव नसल्यामुळे झालेल्या चुका होत्या. व्हीज्युअल्स मध्ये ब्लॅक जाणं, लोकांची नावं चुकीची जाणं (नावं माहिती असायची पण स्लग ऍस्टन मधील तांत्रिक बाबींमुळे ती चुकायची) या काळात मेघराज पाटील, गजाभाऊ कदम ही मंडळी डेस्क सांभाळायची आणि त्यांच्यावर अशोक सुरवसे होते. "काही" चुका वरिष्ठांनी माफ केल्या काहींबद्दल समजा...