कॉलेज संपल्यावर काय
करायचं या विवंचनेत असताना माझ्या शाळेतला मित्र जयेश जोशी मुळे मला दिव्यज्ञान
प्राप्त झालं की मराठीमध्ये पत्रकारितेचा कोर्स उपलब्ध आहे. क्षणाचाही विलंब न
करता मी कोर्स साठी प्रवेश घेऊन टाकला. ख-या अर्थाने कॉलेजचे दिवस मला अनुभवायला
मिळाले ते याच काळात. मी आणि जयेशने कॉलेजच्या अधिकृत वेळेचा सदुपयोग मरीन
ड्राईव्ह वर टाईमपास करण्यात किंवा “प्लॅनेटM”
मध्ये गाणी ऐकण्यात घालवलाय. नंतर जयेशचा सिलॅबस संपला आणि
तो कॉलेजला फारसा येईनासा झाला. मग माझी लढाई(टाईमपासची) मलाच लढावी लागली. या
काळात जरा गांभीर्याने लेक्चरला बसायला लागलो, पण गांभीर्य अगदी काही तासातच ओसरलं आणि त्या अभ्यासाचा
कंटाळा येऊ लागला.
अभ्यासाचा कंटाळा येत
असला तरी वर्गामध्ये जरा मजा यायची, आमच्या
बॅचला मुलांचं प्रमाण मुलींच्या तुलनेत 30: 3 असं होतं. अभ्यास हा धर्म आहे आणि या धर्माचं प्रत्येकानं पालन केलंच पाहीजे
अशी धारणा केलेल्या अनेक मुली वर्गामध्ये होत्या, त्यांच्याकडे बघितलं की उगाच दडपण यायचं. मला आज कॉलेजमध्ये
काय शिकलो हे अजिबात आठवत नाहीये, पण या कॉलेजने माझ्यातल्या
कवीला नक्की जागं केलं त्याबद्दल कॉलेजला द्यावं तेवढं श्रेय कमीच आहे. (अर्थात
माझ्या कविता फक्त मलाच आवडायच्या) सर्वसाधारणपणे मुलं कॉलेजमधून बाहेर पडताना
डिग्री नामक कागदाची भेंडोळी घेऊन बाहेर पडतात, मी मात्र
काही चांगल्या आठवणी घेऊन कॉलेजमधून बाहेर पडलो. मी वर्गातल्य़ा प्रत्येक बेंचवर
बसून बघितलं (काही मंडळी पहिला बेंच सोडायची नाहीत आणि काही शेवटचा) आणि या
निष्कर्षापर्यंत पोचलो की ज्याला शिकायचं असतं तो पहिल्या बेंचवर बसूनही शिकतो आणि
शेवटच्या बेंचवर बसूनही.
या
ही कोर्समधून मी फार काहीही शिकलो नाही, फक्त
मिळालेली डिग्री नोकरी मिळवण्यासाठी शिडी म्हणून उपयुक्त ठरली. काही गोष्टी न
ठरवता होतात जर्नालिझमची मिळालेली डिग्री आणि त्यानंतर लागलेली नोकरी हे
माझ्यासाठी याचं एक उत्तम उदाहरण ठरलंय. पण या गोष्टी साध्या करण्यामध्ये जयेश आणि
बॅचच्या काही सहका-यांचे मला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील.
या
बॅचमध्ये माझ्याबरोबर असलेली लोकं आज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, अंतरामुळे आमच्यातला संवाद कमी झाला असला तरी तो कायम टीकून
आहे हे विशेष. प्राजक्ता कदम या लोकसत्तेत आहेत, शीतल गवस
यांनी नुकतंच जनप्रवाह मासिक सोडून घरी आराम करण्याचा निर्णय घेतलाय, शीतल पालकर या विवेक नावाच्या मासिकामध्ये चांगलं काम करतायत, पर्णिका हेदवकर या दूरदर्शन वरून सगळ्यांना दुरून दर्शन देतायत , योगेश पाटील यांनी पत्रकारिताच सोडून दिली आणि ते सध्या अज्ञातवासात
गेलेत. या सगळ्यांना जर्नालिझमच्या बॅचने काही ना काही तरी दिलंय. माझं म्हणायचं
झालं तर मला यांच्यासारखे मित्र मैत्रिणी मिळाले आणि जसं मी मगाशी सांगितलं तश्या
काही चांगल्या आठवणीही मिळाल्या.
hahaaahah .....LIAR!! who made u ryt al tis??? SK telme wat kind of fun u had in our clas n wid whom?? ;):p
ReplyDeletevvud luv 2 read...
dnt tek ma name ..i ll kill u..
impressed by ur polished rytin skillzz bt felt tat .. if it waz RAW wud hv njoyd more..
juz one lynn 4 frenz?? ovr?? :/ waz xpectin a bit more.. NeWayzz...
gudd tat u penned down somthgg.. KIU..ADB!!! :)