पुन्हा मराठीच का ?
राष्ट्रीय चॅनलमध्ये गेलेला मराठी पत्रकार पुन्हा मराठीकडे वळला तर हा प्रश्न
अनेकांना पडू शकतो. मात्र गेल्या काही वर्षात बदललेली परिस्थिती पाहता या
प्रश्नाचं उत्तर मराठी चॅनल्स ना मिलणारं ग्लॅमर हे उत्तर असू शकतं. माझी सुरवातच
मराठी चॅनलपासून झाली, निर्विवादपणे मराठी न्यूज चॅनल्स चा बादशहा म्हणूव ओळखल्या
गेलेल्या ईटीव्ही मराठीपासून कारकिर्द सुरू करत असताना नॅशनल हिंदी चॅनल्स ग्लॅमर
अनेकांना मी खुणावताना पाहीलं होतं. ही परिस्थिती ख-या अर्थानं बदलली 24 तास
बातम्या देणा-या मराठी न्यूज चॅनल्सनी. स्टारमाझा, आय.बी.एन.लोकमत आणि झी24 तास
ने ख-या अर्थानं मराठी बातम्या पाहणा-या दर्शकाला वेगळंपण जाणवून देण्याचं काम
केलं. मात्र अजूनही मराठी न्यूज चॅनल्स पौगंडावस्थेत आहेत आणि त्यांना करण्यासारखं
बरंच काही आहे. मात्र 24 तास बातम्या देणा-या या न्यूज चॅनल्सनी ईटीव्ही न्यूज ची
पोकळी कधीच जाणवू दिली नाही.
साधरणपणे 2002 नंतर हिंदी न्यूज चॅनेल्समध्ये सुरू झालेली स्पर्धा ही आता
मराठी न्यूज चॅनेल्समध्ये बघायला मिळत आहे.
वेगवान बातम्या, चांगल्या बातम्या तसंच हिंदी चॅनेल्सचा प्रभाव असल्यानं
काही प्रमाणात सवंग बातम्याही मराठी न्यूज चॅनेल्सवर पहायला मिळू लागल्या. पण
अवघ्या दोन ते तीन वर्षात मराठी न्यूज चॅनेल्स नी त्यांच्या मोठ्या भावंडांना
म्हणून नॅशनल न्यूज चॅनेल्सना मागे टाकलं. तेव्हा ही बाब स्पष्ट झाली की
महाराष्ट्रमध्ये नॅशनल चॅनेल्स ना त्यांचीच छोटी भावंडं ही धोका ठरायला लागली. एबीपी
माझा ने एबीपी न्यूज चा मोठा वर्ग व(प)ळवला, लोकमत ने आयबीएन सेव्हन आणि सीएनएन
आयबीएन चा प्रेक्षक वर्ग व(प)ळवला आणि असीच स्थिती झी समूहामध्येही बघायला मिळाली.
मराठीबातम्या बघणारा वर्ग वाढण्यामागे कुठल्या राजकीय पक्षाने केलंलं आंदोलन
कारणीभूत नव्हतं, ही गोष्ट यामुळेच शक्य झाली कारण मराठी प्रेक्षक वर्गाची
त्याच्याच भाषेत बातम्या बघायला मिळण्याची भूक भागायला लागली. महाराष्ट्रामध्ये
राजकारण चेवढ्या चवीनं चर्चिलं जातं तेवढ्य़ाच चवीनं सिनेमा, नाटक, साहित्य यावरही
चर्चा झडताना दिसतात. नॅशनल न्यूज चॅनलसाठी नगण्य असणारी उत्तुंग माणसं मराठी
माणसाची हिरो होती. ही माणसं मराठी न्यूज चॅनेल्समुळे अजून मोठी झाली, घराघरात
पोचली. मराठी न्यूज चॅनलमध्ये येत असलेलं हे स्थित्यंतर अन्य राज्यामध्ये फार आधीच
बघायला मिळत होतं, मग ते तमिळनाडू असो, पश्चिम बंगाल असो किंवा गुजरात. या सगळ्या
राज्यांमध्ये प्रादेशिक वाहिन्या जबरदस्त फॉ़र्ममध्ये आहेत.
महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रतिभावान असून नॅशनल न्यूज चॅनलमध्ये त्यांना
फारश्या मोठ्या संधी मिळाल्या नाहीत किंवा जाणूनबुजून दिल्या नाहीत. ज्यांना
मिळाल्या त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्यासारखी आहे. हे पत्रकार मराठी न्यूज
चॅनेल्सनी मोठे केले, अनेक प्रिंटमधले पत्रकार ज्यांचा दांडगा अभ्यास असून हिंदी
न्यूज चॅनेल्स चर्चेला बोलवत नव्हती, त्यांना मराठी न्यूज चॅनेल्सनी ख-या अर्थानं
चेहरा दिला. आता परिस्थिती अशी आली आहे की यातल्या अनेक जणांना हिंदी आणि मराठी
पर्याय विचारला तर त्यांचं पहिलं प्राधान्य मराठी न्यूज चॅनेल्स असतात.
जी परिस्थिती किंवा जी तेजी साधारणपणे दहा वर्षांपूर्वी हिंदी किंवा इंग्लिश
न्यूज चॅनेल्समध्ये दिसत होती तशीच परिस्थिती आता मराठी न्यूज चॅनेल्समध्ये दिसायला
लागली आहे. अपेक्षा हीच आहे की मराठी न्यूज चॅनेल्सचा स्तर असाच उत्तम रहावा.
येणा-या काळात अजून मराठी न्यूज चॅनेल्स येतायत त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी
न्यूज चॅनेल्समधील स्पर्धा अजून तीव्र होत जाणार. साहजिकच याचा फायदा मराठी
पत्रकार, जाणकार आणि प्रेक्षकांनाच होईल
असा परिस्थितीत मराठी पत्रकारांची पावलं पुन्हा मराठी न्यूज चॅनेलकडे वळायला लागली
तर त्यावर असं का झालं हा प्रश्न उभा राहणार नाही.
waa mast
ReplyDelete