आमची शाळा मध्यमवर्गीयांची होती, यातही बरेच विद्यार्थी असे होते ज्यांचे पालक जीवतोड मेहनत करून मिळेल त्यातल्या पैशातून कसंही करून मुलाला शिकवायचंच या जिद्दीने मुलांना शिकवणारे होते. अशा मुलांना अगदी नाममात्र म्हणजे 5 किंवा 10 रूपये फी पण परवडायची नाही त्यांच्याकडून सहलीसाठी पैसे कुठून मागायचे हा पण एक मोठा प्रश्नच होता. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फारसा कोणी प्रयत्नच केला नाही.
जवळपास दिड वर्षापूर्वी शाळेत आमच्याबरोबर असलेले जे-जे जमतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. एकमेकांची विचारपूस करत असताना प्रत्येकजण आता काय करतोय हे कळत होतं. दहावीपर्यंत नुसता उंडगत फिरणारा आनंद संचेती आता इंजनिअर झाला, फॉरेनला गेला, नापास झाल्होयामुळे आमच्या बरोबर आलेला आणि नंतर आमच्याच बरोबरचा झालेला अमित कदम स्व:तचं दुकान चालवतो (आणि ते ही अतिशय उत्तम पद्धतीने) सायन्स करून कॉलेजमधून बाहेर पडलेला निलेश पाटील केमिकल चा प्लॅन्ट एकट्याच्या जीवावर उभा करू शकतो. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त रस असलेला प्रीतम परब एक मल्टीनॅशनल बँकेत मोठ्या पदावर आहे. जयेश जोशी स्वतची इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनी चालवतोय (सगळ्यांची माहिती आठवत नाही पण प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात नाव कमवताना दिसत होती) अशी असंख्य मुलं भेटत होती आणि ती मला नव्याने कळत होती.
शाळेने मला काय दिलं याबद्दल मी नेहमी विचार करतो, आणि नेहमी मी ज्या उत्तरापाशी येतो ते उत्तर असतं “काहीही नाही” शाळेत जातानाही पाटी कोरी होती आणि बाहेर पडतानाही कोरीच होती. शाळेतली मुलं काय करू शकतात याचा अंदाज कोणालाच नव्हता. याचं मुक्य कारण या मुलांना फक्त शिक्षण हे जगात उपयोगी पुडणारं नाहीये, त्याही पेक्षा जास्त काहीतरी त्यांना कळायला हवं हे शिक्षकांना उमगतच नव्हतं. मराठीचा वर्ग चित्रकलेच्या बाई घेणार, चित्रकलेचा वर्ग गणिताच्या बाई घेणार अशी पर्यायी पद्धत शाळेत राबवली जात होती. एकाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीचं फार ज्ञान नाही ती व्यक्ती मुलांना कशी शिकवत असेल याचं उत्तर मला आजही सापडत नाही. जेव्हा शाळेतली मुलं एकत्र भेटली तेव्हा एक विचार पुढे आला की आपल्यातल्या प्रत्येकाने आताच्या मुलांना आपापल्या क्षेत्राबद्दल थोडी जरी माहिती दिली किंवा आपल्या कामाचा वापर त्यांना वेगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी केला तर खूप फरक पडू शकेल. (आपल्याला जे मिळालं नाही ते या मुलांना तरी मिळावं ही या मागची भावना होती)
पण ही एकतर्फी गोष्ट होती, शाळेनं शाळा सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांशी संवाद ठेवला ? किती माजी विद्यार्थ्यांना अडचणी सांगितल्या ? या दोन गोष्टी जरी माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या तर ते शाळेला मदत करणार नाहीत का ? परिस्थिती बदलण्यासाठी फारसे प्रयत्न कोणीच करताना दिसत नाही ना शाळा ना माजी विद्यार्थी. कदाचित हा ब्लॉग वाचल्यावर परिस्थिती काही अंशी बदलेल असं वाटतंय, पाहूयात...
Nice one..
ReplyDeleteखुप छान लिहलंय.. अगदी नॉस्टेलजीक आहे.. तुला पडलेला प्रश्न सर्वांनाच पडतो शाळा-क़ॉलेजनं काय दिलं.. मला इथं तुला एक तेगलू सिनेमा सजेस्ट करावासा वाटतोय.. हैपी डेज... या सिनेमातल्या हिरोला चंदूला ही कॉलेजच्या शेवटच्या दिवशी हाच प्रश्न पडतो. कॉलेजमध्ये येऊन आपण काय मिळवलं. त्यावेळी त्याचा प्राध्यापक आणि चंदूतला संवाद तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकेल.. मुळ तेगलुत असलेल्या संवादाचं इंग्रजी सबटायटल ट्रान्सलेशन...
ReplyDeleteChandu -
This is my college.
For four years, my home.
No Idea..
Suddenly, I felt it shockingly.
As if I am leaving this home.
Water swirled in my eyes..
No idea.. A weakening feeling..
Suddenly, I heard dad's words clearly.
What did you achieve?
college is about to finish
I have no idea what to do
I dont know what I achieved.
I dont want to leave this home.
Am I afraid of outside world?
Or love towards college?
This much of confusion...
I feel every one else is feeling fine.
Every one has some thing to do in life..
What about me?
Sir - Why are you sitting here?
Chandu - Nothing much sir.
What did I Learn?
What did I achieve?
I'm in just as much confusion as when I joined college.
Sir - Chandu.. Never think like that.
Ofcourse you have learnt. you learnt to differentiate between right and wrong.
you learnt to differentiate between right and wrong.
Learnt how to help people who are weaker than you.
What's sacrifice..
What's good friendship..
You know all these now.
Nobody comes to college for achieving.
They come to earn capacity to achieve.
lai bhari.. patrakar saheb..
ReplyDeleteShaalene aaplyala kaay dile, Hya prashnacha uttar tu shodhnyacha prayatna kelaas, pan nakki tula kaay apekshit hote he kaahi kale na. Partly, you have answered your question yourself, School was charging less than nominal fees. Without any big funding, expecting exceptional teachers, teaching methodologies, is overkill I believe. What we got from school cannot be weighed/ compared.
ReplyDeleteIn general we forget the value of some of the basic learnings when we go for so called 'higher' educations, but in nutshell whatever you are today, whatever I am today and for that matter whatever everyone of us could achieve today has its root in our school..
Thats how I look at it... So dont be so critical about the school that gave you so many wonderful memories, friends, your basic skills... :-)