मी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र फिरलोय. राज्यात पडलेला दुष्काळ खासकरून जवळून बघितला, त्यावरून झालेलं राजकारणही बघितलं. या दुष्काळाच्या काळात एक बातमी ही आजही मला चांगल्या पद्धतीने लक्षात आहे. मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या शहापूरपासून जवळच एक डेंगणमाळ नावाचं गाव आहे. या गावातील महिला टकल्या व्हायला लागल्या होत्या. केस जाण्यामागचं मुख्य कारण होतं ते पाण्याचं दुर्भिक्ष. ही बातमी करायला गेलो असताना मला भलतीच बातमी सापडली. डेंगणनमाळ अत्यंत गरीब आणि आदिवासी गाव आहे. मुंबई ठाण्यासारखी शहरं जवळ असूनही हे गाव काही सुधारलेलं नाही. या गावातील महिला टकल्या व्हायला सुरुवात झाल्याचं कळालं. गावात गेलो. विचारलं की काय होतंय, कशामुळे या महिलांचे केस जायला लागले? यावर त्या महिला म्हणाल्या की आमचा अख्खा दिवस पाणी आणण्यात जातो. एखा खेपेत जमेल तेवढं पाणी आणायचा प्रयत्न असतो. हंडा जड असतो, डोक्यावर घेऊन चालत येताना केस ओढले जातात आणि मुळापासून तुटतात, हे गेलेल केस काही परत येत नाही, परिणाम असा की टक्कल पडायला लागलं. महिलांशी बोलत असताना एक माणूस भेटला, त्याच्याशी बोलत असताना तो म्हणाला की या ग...