Skip to main content

ढेबरे विगमास्टर





गेल्या काही दिवसात दोन मराठी चित्रपट अभिनेते चर्चेत आलेत. पहिला म्हणजे सचिन पिळगांवकर आणि त्याच्याचमुळे चर्चेत आलेला स्वप्नील जोशी. विग लावून नाचणारे, सुटलेली पोटं घेऊन कॉलेजमधल्या तरुणाची भूमिका करणारे हे नायक मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले, असं म्हणतात. मात्र, ज्या प्रतिक्रिया सचिन पिळगांवकरांच्या गाण्यावर आल्या त्या पाहता तो फक्त भ्रम होता, असं ठामपणे वाटायला लागलं आहे.







सचिन पिळगांवकर ज्यांना आज मराठी चित्रपट सृष्टीत महागुरू म्हणून टोपणनाव दिलं गेलंय, त्यांची काही दिवसांपूर्वी मनसोक्त भंकस केली गेली. ज्या पद्धतीने त्यांच्या ‘ मुंबई अँथम’ वर प्रतिक्रिया आल्या त्या पाहता त्यांना सोशल मिडीयावरून हाणण्यासाठी लोकं टपून बसली होती असं स्पष्टपणे जाणवायला लागलं आहे. सचिननंतर स्वप्नील जोशीचा नंबर आहे हे सचिनच्या व्हिडीओवर आणि नंतर त्याने लिहलेल्या फेसबुक पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येतंय. हा राग का ? इतरांवर तो का नाही ? याचा विचार होणं गरजेचं आहे.


सचिननंतर स्वप्नील जोशीचा नंबर आहे, हे सचिनच्या व्हिडीओवर आणि नंतर त्याने लिहलेल्या फेसबुक पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांवरून लक्षात येतंय. हा राग का? इतरांवर तो का नाही? याचा विचार होणं गरजेचं आहे.

सचिन आणि स्वप्नील जोशी या दोघांमधील एक समानता आहे ती म्हणजे दोघेजण विग घालतात, लाडात आल्यासारखा अभिनय करतात आणि अनेकदा ओव्हर अॅक्टिंग करतात. कृष्णा या हिंदी मालिकेमुळे स्वप्नील जोशी लहानपणातच भलताच प्रसिद्ध झाला होता. सचिन पिळगांवकरही बालकलाकार म्हणून काम करत करत नावारुपाला आले. लहानपणापासून प्रसिद्धीची सवय लागलेल्या सचिन यांच्या डोक्यात फार पूर्वीपासून हवा गेलेली आहे. अभिनयापेक्षा ते त्यांच्या अतिसार होईपर्यंत जडजड शब्दांच्या फेकाफेकीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना हिंदी आणि उर्दू चांगली समजते म्हणून ते गुलजार यांच्यासारखे सगळीकडे शेर, गजल ऐकवायला लागले तर आवडेल का? मात्र हा प्रश्न त्यांच्या मनालाही शिवत नाही.


गर्वाची बाधा ही गॅससारखी असते, अंगात भरली की माणूस उडायला लागतो. सुदैवाने स्वप्नील जोशीला तशी हवा अद्याप लागलेली नाही, त्याने पाय अजून तरी जमिनीवर ठेवलेले दिसतायत. मात्र हे दोघेही नायक, अभिनयाच्या कसोटीवर तपासून पाहताना अभिनयाच्या नावाखाली अतिशयोक्ती केल्यासारखे वाटतात. दुनियादारीमध्ये स्वप्नील जोशीला अकरावीत प्रवेश घेणारा विद्यार्थी दाखवणं हा म्हणजे कहर होता. सचिन पिळगांवकरांना आजही मुख्य नायकाची भूमिका दिली तर ते करायला एका पायावर तयार होतील. आपण निवृत्ती केव्हा घ्यावी, हा संकेत आपलं मन देत असतं. पिळगांवकरांचं हे अंतर्मन बहुधा ‘मुंबई अँथम’ ऐकल्यानंतर आत्महत्या करायला गेलं असावं.


चित्रपटसृष्टीमध्ये सध्याच्या घडीला नुसते देखणेच नाही, तर उत्तम अभिनयक्षमता असलेले बरेच नट आहेत, ज्यांना पुरेशी संधी मिळालेली नाही. गश्मीर महाजनी, वैभव तत्ववादी हे यापैकी आघाडीचे नट आहेत. विचार करून पाहा की जर यातील कोणाला ‘शर्यत’, ‘सांगतो ऐका’, ‘दुनियादारी’ , ‘मुंबई-पुणे-मुंबई’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका दिली असती तर तो चित्रपट कसा बनला असता. माझ्यामते आत्ताच्यापेक्षा तो नक्कीच चांगला बनला असता.

पोटं सुटलेले, थोराड दिसणारे नट विशीतील नट्यांबरोबर उड्या मारत नाचतानाचा ट्रेंड दक्षिणेकडील चित्रपटांनी आणला. तो मराठीमध्येही आणण्यात आला. किती प्रेक्षकांना तो आवडला हे सांगता येणं कठीण आहे, कारण तुफानी पीआर, आऊटडोअर कँपेन राबवून चित्रपट उचलला जाऊ शकतो हे ‘झी’ ने सिद्ध केलंय. या अशा ढेबऱ्या (पोटं सुटलेल्या) विग घालून काम करणाऱ्या कलाकारांनी आता थांबायला पाहिजे. सचिन पिळगांवकरांच्या व्हिडीओवरील कमेंटने हा संदेश दिलाय. स्वप्नील जोशीसाठी या प्रतिक्रिया धोक्याचा इशारा आहे. सचिन पिळगांवकरांचे आजवरचे एकूण रागरंग पाहता त्यांना आपल्याला कोण काय बोलतंय यावर काहीही फरक पडणार नाही. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ हा डायलॉग बहुधा सचिन पिळगांवकरांना बघितल्यावर सेक्रेड गेम्सच्या पटकथाकारांना सुचला असावा अशी माझी ठाम धारणा आहे. जसे स्वत:ला देवाचा अवतार म्हणवणारे भोंदूबाबा असतात तसे हे अभिनयातील भगवान आहेत, असं म्हणणारे भोंदू अभिनेते आहेत असं म्हणायला हरकत नाही. मराठी चित्रपटसृष्टीच्या भल्यासाठी या भोंदू लोकांचा अवतार आता समाप्त होणं आता गरजेचं आहे.

Comments

Popular posts from this blog

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

प्रेक्षकांवर बलात्कार करणारी ‘ झी’ मराठी

  रोजच्या कंटाळवाण्या जगात मनोरंजन म्हणून मालिका हा त्यांच्यावरचा हमखास उतारा , असं काहीसं चित्रं गेल्या काही वर्षांत तयार झालं आहे. पण , मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही प्रेक्षकांचा अंत पाहू लागलात , तर काही दिवसांतच ‘ झी ’ चा सचिन पिळगावकर होऊ शकण्याचे चान्सेस वाढायला लागले आहेत. याची मुख्य कारणं दोन , एक म्हणजे संहिता आणि त्यांच्या निर्बुद्धाने लिहिल्या असाव्यात अशा वाटणाऱ्या पटकथा. आणि दोन.. सध्या झीचे मालिका सोडून मार्केटिंगचे बरेच काही इतर उद्योग सुरू आहेत , त्यामुळे स्पर्धेत ही वाहिनी आता मागे पडत चालली आहे. ९०च्या दशकात जेव्हा केबलचं प्रस्थ वाढायला लागलं तेव्हा प्रादेशिक भाषांमधील चॅनल्स यायला लागले. त्यात मराठी भाषेतही आले. तारा , प्रभात , ईटीव्ही , मी मराठी आणि तेव्हाचं अल्फा (आताचं झी) मराठी. ही त्यातल्या त्यात प्रमुख नावं. त्यातलं झी हे नाव वगळता उरलेली सगळी नावं आता गुजरा जमाना झालीयेत. सुरुवातीलाच हे संदर्भ द्यायचं कारण म्हणजे झी मराठी या उरलेल्या चॅनलचा प्रेक्षकांवरचा वाढत चाललेला अत्याचार. मनोरंजनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते दाखवण्याचा चंगच झीने बांधलेला ...