Skip to main content

मराठी चॅनेल्समधील स्थित्यंतर

पुन्हा मराठीच का ?
राष्ट्रीय चॅनलमध्ये गेलेला मराठी पत्रकार पुन्हा मराठीकडे वळला तर हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र गेल्या काही वर्षात बदललेली परिस्थिती पाहता या प्रश्नाचं उत्तर मराठी चॅनल्स ना मिलणारं ग्लॅमर हे उत्तर असू शकतं. माझी सुरवातच मराठी चॅनलपासून झाली, निर्विवादपणे मराठी न्यूज चॅनल्स चा बादशहा म्हणूव ओळखल्या गेलेल्या ईटीव्ही मराठीपासून कारकिर्द सुरू करत असताना नॅशनल हिंदी चॅनल्स ग्लॅमर अनेकांना मी खुणावताना पाहीलं होतं. ही परिस्थिती ख-या अर्थानं बदलली 24 तास बातम्या देणा-या मराठी न्यूज चॅनल्सनी. स्टारमाझा, आय.बी.एन.लोकमत आणि झी24 तास ने ख-या अर्थानं मराठी बातम्या पाहणा-या दर्शकाला वेगळंपण जाणवून देण्याचं काम केलं. मात्र अजूनही मराठी न्यूज चॅनल्स पौगंडावस्थेत आहेत आणि त्यांना करण्यासारखं बरंच काही आहे. मात्र 24 तास बातम्या देणा-या या न्यूज चॅनल्सनी ईटीव्ही न्यूज ची पोकळी कधीच जाणवू दिली नाही.

साधरणपणे 2002 नंतर हिंदी न्यूज चॅनेल्समध्ये सुरू झालेली स्पर्धा ही आता मराठी न्यूज चॅनेल्समध्ये बघायला मिळत आहे.  वेगवान बातम्या, चांगल्या बातम्या तसंच हिंदी चॅनेल्सचा प्रभाव असल्यानं काही प्रमाणात सवंग बातम्याही मराठी न्यूज चॅनेल्सवर पहायला मिळू लागल्या. पण अवघ्या दोन ते तीन वर्षात मराठी न्यूज चॅनेल्स नी त्यांच्या मोठ्या भावंडांना म्हणून नॅशनल न्यूज चॅनेल्सना मागे टाकलं. तेव्हा ही बाब स्पष्ट झाली की महाराष्ट्रमध्ये नॅशनल चॅनेल्स ना त्यांचीच छोटी भावंडं ही धोका ठरायला लागली. एबीपी माझा ने एबीपी न्यूज चा मोठा वर्ग व(प)ळवला, लोकमत ने आयबीएन सेव्हन आणि सीएनएन आयबीएन चा प्रेक्षक वर्ग व(प)ळवला आणि असीच स्थिती झी समूहामध्येही बघायला मिळाली.

मराठीबातम्या बघणारा वर्ग वाढण्यामागे कुठल्या राजकीय पक्षाने केलंलं आंदोलन कारणीभूत नव्हतं, ही गोष्ट यामुळेच शक्य झाली कारण मराठी प्रेक्षक वर्गाची त्याच्याच भाषेत बातम्या बघायला मिळण्याची भूक भागायला लागली. महाराष्ट्रामध्ये राजकारण चेवढ्या चवीनं चर्चिलं जातं तेवढ्य़ाच चवीनं सिनेमा, नाटक, साहित्य यावरही चर्चा झडताना दिसतात. नॅशनल न्यूज चॅनलसाठी नगण्य असणारी उत्तुंग माणसं मराठी माणसाची हिरो होती. ही माणसं मराठी न्यूज चॅनेल्समुळे अजून मोठी झाली, घराघरात पोचली. मराठी न्यूज चॅनलमध्ये येत असलेलं हे स्थित्यंतर अन्य राज्यामध्ये फार आधीच बघायला मिळत होतं, मग ते तमिळनाडू असो, पश्चिम बंगाल असो किंवा गुजरात. या सगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक वाहिन्या जबरदस्त फॉ़र्ममध्ये आहेत.

महाराष्ट्रातील पत्रकार हे प्रतिभावान असून नॅशनल न्यूज चॅनलमध्ये त्यांना फारश्या मोठ्या संधी मिळाल्या नाहीत किंवा जाणूनबुजून दिल्या नाहीत. ज्यांना मिळाल्या त्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्यासारखी आहे. हे पत्रकार मराठी न्यूज चॅनेल्सनी मोठे केले, अनेक प्रिंटमधले पत्रकार ज्यांचा दांडगा अभ्यास असून हिंदी न्यूज चॅनेल्स चर्चेला बोलवत नव्हती, त्यांना मराठी न्यूज चॅनेल्सनी ख-या अर्थानं चेहरा दिला. आता परिस्थिती अशी आली आहे की यातल्या अनेक जणांना हिंदी आणि मराठी पर्याय विचारला तर त्यांचं पहिलं प्राधान्य मराठी न्यूज चॅनेल्स असतात.


जी परिस्थिती किंवा जी तेजी साधारणपणे दहा वर्षांपूर्वी हिंदी किंवा इंग्लिश न्यूज चॅनेल्समध्ये दिसत होती तशीच परिस्थिती आता मराठी न्यूज चॅनेल्समध्ये दिसायला लागली आहे. अपेक्षा हीच आहे की मराठी न्यूज चॅनेल्सचा स्तर असाच उत्तम रहावा. येणा-या काळात अजून मराठी न्यूज चॅनेल्स येतायत त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी न्यूज चॅनेल्समधील स्पर्धा अजून तीव्र होत जाणार. साहजिकच याचा फायदा मराठी पत्रकार, जाणकार आणि  प्रेक्षकांनाच होईल असा परिस्थितीत मराठी पत्रकारांची पावलं पुन्हा मराठी न्यूज चॅनेलकडे वळायला लागली तर त्यावर असं का झालं हा प्रश्न उभा राहणार नाही.  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

प्रेक्षकांवर बलात्कार करणारी ‘ झी’ मराठी

  रोजच्या कंटाळवाण्या जगात मनोरंजन म्हणून मालिका हा त्यांच्यावरचा हमखास उतारा , असं काहीसं चित्रं गेल्या काही वर्षांत तयार झालं आहे. पण , मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही प्रेक्षकांचा अंत पाहू लागलात , तर काही दिवसांतच ‘ झी ’ चा सचिन पिळगावकर होऊ शकण्याचे चान्सेस वाढायला लागले आहेत. याची मुख्य कारणं दोन , एक म्हणजे संहिता आणि त्यांच्या निर्बुद्धाने लिहिल्या असाव्यात अशा वाटणाऱ्या पटकथा. आणि दोन.. सध्या झीचे मालिका सोडून मार्केटिंगचे बरेच काही इतर उद्योग सुरू आहेत , त्यामुळे स्पर्धेत ही वाहिनी आता मागे पडत चालली आहे. ९०च्या दशकात जेव्हा केबलचं प्रस्थ वाढायला लागलं तेव्हा प्रादेशिक भाषांमधील चॅनल्स यायला लागले. त्यात मराठी भाषेतही आले. तारा , प्रभात , ईटीव्ही , मी मराठी आणि तेव्हाचं अल्फा (आताचं झी) मराठी. ही त्यातल्या त्यात प्रमुख नावं. त्यातलं झी हे नाव वगळता उरलेली सगळी नावं आता गुजरा जमाना झालीयेत. सुरुवातीलाच हे संदर्भ द्यायचं कारण म्हणजे झी मराठी या उरलेल्या चॅनलचा प्रेक्षकांवरचा वाढत चाललेला अत्याचार. मनोरंजनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते दाखवण्याचा चंगच झीने बांधलेला ...