Skip to main content

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

 

एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.  गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे. 

बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं मला वाटतं. दाक्षिणात्य चित्रपटांचं प्रमाण गेल्या १० वर्षात वाढलेलं दिसतंय आणि याच काळात बलात्काराचेही प्रमाण वाढत गेल्याचं जाणवतंय.
या चित्रपटांमध्ये नव-नव्या उफाड्याच्या मादक अभिनेत्री दाखवण्यात येतात, त्यांच्यासमोरचे नायक हे २० वर्षांपासून ६० वर्षांपर्यतचा कोणीही माणूस असू शकतो. नायक अशक्य करामती करत असताना तो या नायिकेलाही आपल्या प्रेमात अडकवत असतो. एक खलनायकही असतो त्याचा किंवा त्याच्या भावाचा किंवा अन्यनातेवाईकाचा फिरून फिरून इंटरेस्ट नायिकेमध्येच असतो. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये नायकाला नायिका भीकही घालत नसते. तरीही तो तिच्या मागे फिरत असंख्य लोकांना मारत तिला पटवतो हे जवळपास सगळ्या चित्रपटांमध्ये दिसतं. हे चित्रपट बघणाऱ्यांना आणि त्याच्या प्रेमात पडणाऱ्यांना हेच वाटत राहतं की मिळाली तर ठीक नाहीतर हिसकावून घेऊ. त्यात त्यांना हिरोसारखा फील येत असतो.
एक उदाहरण देऊन मी माझा तर्क पटवून देण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपूर्वी टीव्हीवर रॅम्बो नावाचा (स्टॅलोनचा नाही) एक चित्रपट पाहात होतो. या चित्रपटातील नायिकेचं लग्न ठरलेलं असतं. नायकाला हे माहिती नसतं आणि तो तिच्या प्रेमात पडतो. प्रेमात पडल्यानंतर त्याला कळतं की तिचं लग्न ठरलंय. मग तो तिच्या लग्नघरात घुसून होणाऱ्या नवऱ्याला आव्हानं देत अनेक उपदव्याप करत नवऱ्याला मारहाण करत नायिकेकडून कबूल करवून घेतो की ती त्याच्या प्रेमात आहे. असले सिनेमे बघून अक्कल गुडघ्यात असलेल्या स्वत:ला हिरो समजणाऱ्या तरुणांना वाटायला लागतं की तरुणीचं लग्न ठरलेलं असो किंवा झालेलं आपण मागे लागलो की मनासारखं होईल. प्रत्यक्षात असं झालं नाही की मन त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला जातो आणि मग धडा शिकवण्यासाठी अॅसिड फेकणं,विनयभंग करणं, बलात्कार करणं असले प्रकार केले जातात.

मी एका मानसोपचारतज्ज्ञांशीही याबाबत बोललो, त्यांनी ही बाब नाकारली नाही की दाक्षिणात्य सिनेमांमधील अतिरेकी गोष्टींमुळे हिंसाचार आणि अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मात्र ही गोष्ट सखोल अभ्यासानंतर आकडेवारीनिशी सिद्ध होणं गरजेचं आहे. महिला, लहान मुलं-मुली यांच्यावरील अत्याचार करणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांची स्वभाववैशिष्ट्ये जाणून घेतली तर या गोष्टीबाबत अधिक माहिती मिळू शकेल. अशा कैद्यांना तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते आहात का ? हा एक प्रश्न सामायिक ठेवला तर याचं शास्त्रशुद्ध उत्तर मिळू शकेल. हे संशोधन होईल किंवा नाही माहिती नाही मात्र तुम्ही ब्लॉगमधील मताशी सहमत असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया जरुर नोंदवा. संशोधन झाल्यास तुमचे मत सुजाण नागरीक म्हणून विचारात घेता येऊ शकेल.  

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या...

एका बादलीनं जग बदलेल

                                आत्तापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही. मग काय करायचं ?   हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते...