आत्तापर्यंत राज्याच्या
वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट
हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात
येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज
चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली
योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी
होऊच शकत नाही. मग काय करायचं?
हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो
अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना
खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला
असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून
दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर
उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते. अशी एक चळवळ
सुरू होणं गरजेची आहे, ही चळवळ सोशल नेटवर्कींग साईटवर किंवा व्हॉटसअपवर सुध्दा
प्रभावीपणे सुरू करता येईल.
ही चळवळ आहे “एका बादलीची चळवळ” आंघोळीसाठी तुम्हाला किती
पाणी लागतं ? शॉवर सोडून भसाभसा पाणी वाया घालवलंत तर शेकडो लिटर पाणी लागेल. मात्र एका
बादलीत किंवा अर्धा बादलीत आंघोळ करायचं ठरवलंत तर ६ किंवा ७ लिटरमध्ये सहजपणे होऊ
शकेल. विचार कदाचित छोटा वाटू शकेल मात्र त्याचे परिणाम फार मोठे होऊ शकतात. मागे
आईस बकेट चँलेंज नावाची क्रेझ निघाली होती. तसं आपण एक बादली चळवळ का सुरू करू शकत
नाही ? आजही राज्यात परिस्थिती काही वेगळी नाही. भयंकर पाणी टंचाई निर्माण झालेली आहे,
आणि येत्या काही महिन्यात ती आणखी उग्र रूप धारण करेल.
काल भरून ठेवलेलं पाणी आज शिळं
झालं म्हणून बादल्याच्या बादल्या पाणी ओतून देणारे नागरिक आजही बघायला मिळतात. हे
चित्र बदलू शकेल त्यांच्या घरी जाऊन त्यांना दमदाटी करण्याची किंवा त्यांचे पाय
धरण्याची अजिबात गरज नाही सगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांचा वापर करून हे शक्य
होऊ शकतं, अर्थात हल्ली चांगल्या बातम्यांना जागा आणि वेळ फार कमी मिळतो, त्यामुळे
सोशल नेटवर्कींग साईट यासाठी चांगली मदत करू शकतील.
वेगळा विचार- पॉर्न साईट
सुरू करण्यापासून एफटीआयआय च्या विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय का अशी चर्चा
करणा-यांनी सकाळची सुरूवात एका बादलीतील आंघोळीनं केली तर बरं होईल.
सकाळची सुरूवात एका बादलीतील आंघोळीनं केली तर बरं होईल.
ReplyDelete