Skip to main content

सुरूवात

नक्की दिवस आठवत नाही मात्र जवळपास 2002-2003 मध्ये मी ईटीव्हीमध्ये कामाला सुरवात केली. पहिली नोकरी, ती ही राज्याबाहेरची ,मुलगा एकटा बाहर जाणार कसा राहणार या काळजीने आईबाबा काहीसे चिंतेमध्ये होते. पण माझ्या मनात भीती नाही हे पाहून त्यांच्या मनातली भीती काहीशी कमी झाली होती. ही परिस्थिती फक्त माझ्या आईबाबांची होती असं नाही, नंतर आलेल्या अमित जोशी किंवा बाकीच्यांच्या घरीही जवळपास अशीच परिस्थिती होती.
कामाचा कुठेही अनुभव नव्हता, पाटी कोरी होती असा परिस्थितीत हैद्राबादचं रामोजी फिल्म सिटीमधलं ईटीव्हीचं ऑफीस बघितलं की भांबावल्यासारखं व्हायचं. नवीन होतो चुका व्हायच्याच होत्या. त्याकाळी अशा चुका केल्या ज्या मागे वळून पाहताना वाटतं की अतिशय शुल्लक होत्या. पण या सगळ्या चुका अनुभव नसल्यामुळे झालेल्या चुका होत्या. व्हीज्युअल्स मध्ये ब्लॅक जाणं, लोकांची नावं चुकीची जाणं (नावं माहिती असायची पण स्लग ऍस्टन मधील तांत्रिक बाबींमुळे ती चुकायची) या काळात मेघराज पाटील, गजाभाऊ कदम ही मंडळी डेस्क सांभाळायची आणि त्यांच्यावर अशोक सुरवसे होते. "काही" चुका वरिष्ठांनी माफ केल्या काहींबद्दल समजावलं, हळूहळू चुका कमी होत गेल्या आणि आत्मविश्वास वाढत गेला.

सुरवातीचे काही दिवस युकेगुडा नावाच्या ठिकाणी मुक्काम केला. नवीन आलेल्या माणसांसाठी काही दिवस राहण्याची या ठिकाणी सोय केली जायची. काही दिवसांनंतर रूम खाली करण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा एकदा मोठं संकट उभं राहील्यासारखं वाटलं. कारण ओळखीचं कोणी नाही, यावेळी सचिन फुलपगारे नामक प्राणी उगवला आणि त्याने मदतीचा हात पुढे केला. घरी रहायला बोलावण्यापासून, सामान घरापर्यंत नेईपर्यंत आणि नंतर आयुष्यातले अनेक बरेवाईट प्रसंग शेअर करण्यापर्यंत याने मनापासून मला मदत केली. (योगायोगाने आमची जन्मतारीख सारखीच आहे). दिलसुखनगर भागात असलेल्या या घरामध्ये आशिष चांदोरकर, सचिन देशपांडे, अमित जोशी सचिन आणि मी इतके जण रहायचो. पण घरी एकत्र भेटल्याचे प्रसंग बोटावर मोजण्याएवढेच होते. कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शिफ्ट असायच्या.

सगळ्यात भयानक असायची नाईट शिफ्ट पहाटे इतकी भयंकर झोप यायची , पण कामावर झोपणं म्हणजे कमी पणाचं लक्षण असं मनात भरवलं गेल्यानं झोपणं म्हणजे पाप असं म्हणत डोळे उघडे ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत काम करायचो. आमच्यानंतर आलेली पोरं गाद्या गिरद्या, अंथरूण पांघरूण घेऊन बिनधास्त झोपायची. आणि आम्ही ईमानदारीचं च्युईंगम चघळत स्वतलाच दोष देत बसायचो. पण आज त्या पोरांकडे पाहताना हे प्रकर्षाने जाणवतं की त्यांच्यात आणि माझ्यात काही ना काही तरी फरक आहे. पाट्या टाकण्यापेक्षा स्वतच नाव व्हावं ही ईच्छा कदाचित ईमानदारीच्या च्युईंगममुळे काही अंशी पूर्ण झालीय.

Comments

  1. होय, मला आठवतंय. एकदा ई टिव्हीच्या ऑफिस बाहेर आम्ही चहा पीत होतो. श्रीरंग म्हणाला अरे त्या शेखर फडकेपर स्टोरी होऊ शकते का ? मी म्हटलं होतं नाही. अरे त्या शेखर फडकेला कोण ओळखतं. श्रीरंग - अरे पण नवीन कलाकार म्हणून करता येऊ शकते ना. श्रीरंग खरतर स्टोरी शोधत होता. नवीन असताना असेच छोटे छोटे विषय स्टोरीसाठी आपण शोधत असतो. पण आता सुमारे सात वर्षानंतर पुन्हा श्रीरंग बरोबर काम करताना त्याला स्टोरी शोधण्याची गरज लागत नाही. कोर्टात त्यानं चांगला जम बसवलाय आणि राजकिय बातम्यामध्ये ही. आता त्याच्याकडे बातम्याच बातम्या असतात. काही अंशी नव्हे तर इमानदारीच्या च्युईंगममुळे त्याचं बरंच नाव झालंय.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

प्रेक्षकांवर बलात्कार करणारी ‘ झी’ मराठी

  रोजच्या कंटाळवाण्या जगात मनोरंजन म्हणून मालिका हा त्यांच्यावरचा हमखास उतारा , असं काहीसं चित्रं गेल्या काही वर्षांत तयार झालं आहे. पण , मनोरंजनाच्या नावाखाली तुम्ही प्रेक्षकांचा अंत पाहू लागलात , तर काही दिवसांतच ‘ झी ’ चा सचिन पिळगावकर होऊ शकण्याचे चान्सेस वाढायला लागले आहेत. याची मुख्य कारणं दोन , एक म्हणजे संहिता आणि त्यांच्या निर्बुद्धाने लिहिल्या असाव्यात अशा वाटणाऱ्या पटकथा. आणि दोन.. सध्या झीचे मालिका सोडून मार्केटिंगचे बरेच काही इतर उद्योग सुरू आहेत , त्यामुळे स्पर्धेत ही वाहिनी आता मागे पडत चालली आहे. ९०च्या दशकात जेव्हा केबलचं प्रस्थ वाढायला लागलं तेव्हा प्रादेशिक भाषांमधील चॅनल्स यायला लागले. त्यात मराठी भाषेतही आले. तारा , प्रभात , ईटीव्ही , मी मराठी आणि तेव्हाचं अल्फा (आताचं झी) मराठी. ही त्यातल्या त्यात प्रमुख नावं. त्यातलं झी हे नाव वगळता उरलेली सगळी नावं आता गुजरा जमाना झालीयेत. सुरुवातीलाच हे संदर्भ द्यायचं कारण म्हणजे झी मराठी या उरलेल्या चॅनलचा प्रेक्षकांवरचा वाढत चाललेला अत्याचार. मनोरंजनाच्या नावाखाली काय वाट्टेल ते दाखवण्याचा चंगच झीने बांधलेला ...