आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवनवी माणसं भेटत असतात, कोणी इतकी डोक्यात जातात की त्यांचं तोंडही बघू नये असं वाटतं पण काही माणसं ही पहिल्याच भेटीत इतकी जवळची वाटतात की त्यांच्याशी पटकन वेव्हलेंग्थ जुळते. माझे अनेक मित्र असे आहेत ज्यांच्याशी पहिल्याच भेटीत मस्त दोस्ती झाली. हा ब्लॉग त्या सगळ्या मित्रांसाठी आहे ज्यांनी ब-या वाईट दिवसांमध्ये मला साथ दिली, आणि जगण्याच्या प्रत्येक क्षणाला वेगळेपण दिलं.
सुरवात शाळेपासून डोंबिवलीची स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळा मध्यमवर्गीयांच्या मुलांची शाळा म्हणून ओळखली जायची. त्यातली गोपाळनगर शाखा काहीशी अडगळीतलीच शाखा होती. शाळेच्या दिवसांमध्ये अनेक मुलं सोबत होती, पण त्यातल्या फार कमी जणांशी मित्रत्वाचं नातं जोडलं गेलं.आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॉलेज पूर्ण होऊन नोकरीला लागल्यावर यातली अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी दिसायची पण इतक्या वर्षांनी एकमेकाकडे बघितल्यावर ओळख नसल्याप्रमाणे सगळे तोंड फिरवायचे...संवाद नसणं हे यातलं एकमेव कारण होते. मात्र काही दिवसांनी हे चित्र बदललं आणि एका गेट-टुगेदरच्या निमित्ताने बरीच मंडळी एकत्र आली आणि अनेकांशी असलेला दुरावा ब-याच प्रमाणात दूर झाला. आज शाळेतले आमच्या बॅचमधली अनेक जणं अशी आहेत ज्यांच्याशी शाळेत असताना कधी नव्हता एवढी जवळीक आताशी निर्माण झालीय.
लहानपणी कॉलनीमधील जवळचे वाटणारे मित्र आता कधी एक साधा कॉलही करत नाहीत आणि कालपरवा भेटलेले मित्र एवढे जवळचे झालेत की घरचा हिस्सा बनून गेलेत. नाती बदलत असतात तसं मित्रत्वाच्या परीभाषा आणि मित्रही बदलत जातात. काही जुने मित्र कायम राहतात, काही जुने मित्र विस्मरणात जातात किंवा त्यांच्यासाठी तुमचं महत्व कमी होतं आणि नंतर ते संबंधच तोडून टाकतात. सुदैवानं आजही लहानपणीचे कॉलनीतले “काहीच” मित्र मैत्री टिकवून आहेत, त्यांना खास धन्यवादच द्यावे लागतील.
राहणारे, ऑफीसमध्ये काम करणारे असे अनेक मित्र या काळात जोडले गेले। घरापासून आयुष्यात पहिल्यांदाच दूर राहत असल्याने ख-या अर्थाने मित्र असणं का गरजेचं आहे याची जाणीव झाली. आणि ती त्यानंतर अधिक अधिक वाढतच गेली।
कामाच्या निमित्ताने आजवर मी तीन संस्था बदलल्या (खरं तर दोन संस्था बदलल्या कारण एका संस्थेत मी अवघा दिड महिनाच काढला) या संस्थांनी आणि कामाने मला असंख्य मित्र आणि मिळाले अनेक मैत्रिणीही जोडल्या ( विशेष म्हणजे यातल्या अनेक जणी माझ्यापेक्षा दिप्तीच्या जास्त जवळच्या आहेत) माझ्या क्षेत्रातलीच नाही तर क्षेत्राबाहेरचीही अनेक दोस्त मंडळी जमवली. यातल्या अनेकांशी दोस्ती ही भंकसपुरता आहे, काहींशी फक्त तात्विक चर्चेसाठी, तर काहींशी मैत्री कशी झाली याचं उत्तर मला आजही सापडलेलं नाही. खरं तर या ब्लॉगमध्ये प्रत्येक मित्राचा उल्लेख करायचा होता पण असं झालं असतं तर एखाद्याचं नाव वगळलं गेलं असतं तर ते मलाच बरोबर वाटलं नसतं. प्रपंचात अडकल्याने कामाच्या भयानक वेळांमुळे, काहींनी हे शहर सोडल्याने अनेक मित्र आधीसारखे भेटत नाही. पण त्यामुळे मैत्रीत काही खंड पडला असं कधीही झालेलं नाही.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteएकदम झक्कास लिहिलं आहे मित्रा
ReplyDeleteझक्कास!
ReplyDelete