Skip to main content

सिक्रेट सुपरस्टार


आपण आपल्या आयुष्यातील अमूल्य माहिती गुगल, फेसबुकला फुकट देत असतो. हीच माहिती ते करोडो रुपयांना विकून त्यांचा धंदा जोरात चालवायला लागले आहेत. किमानपक्षी या दोन संस्थांना थोडीतरी नितीमत्ता आहे, ज्यामुळे त्यांनी आम्ही माहिती चोरली आणि ती विकली हे कबूल तरी करतातय. आपल्या देशात अशा अनेक कंपन्या असतील ज्या वेगवेगळ्या मार्गाने इंटरनेटवरून माहिती जमा करत असतील आणि ज्यांचा कोणाला पत्ताही लागणार नाही. पत्ता लागला तरी त्या कंपन्या कबूल करतील याचा नेम नाही. अशा सगळ्या धटींगणांना पुरून उरणारी डार्क वेब ही संकल्पना उदयास आली.


डार्क वेब हे अंडरवर्ल्ड सारखं आहे, ज्याचा उपयोग चांगल्या कामासाठी कमी आणि वाईट कामांसाठी जास्त उपयोग होतो. रॅनसमवेअर तयार करणारे, खंडणी मागणारे, हेरगिरी करणारे, हॅकींग करणारे हे सगळे डार्क वेबचे सदस्य आहेत. कोणताही चोर असो मग तो पाकिटमार असो, दरोडेखोर असो किंवा इंटरनेटवरून खंडणी मागणारा प्रत्येकाच्या मनात पोलिसांबद्दल भीती असतेच. ही भीती इंटरनेटवर वाईट धंदे करणाऱ्यांच्याही मनात असते.   इंटरनेटवरून संशयास्पद हालचाल दिसली की त्याला पकडण्याचा सोपा मार्ग असतो तो म्हणजे त्याचा आयपी अॅड्रेस शोधून काढणं. फ्रॉड मेल, धमकी देणारे मेल, किडनॅपिंग, फिशिंग, पोर्नोग्राफी असे सायबर गुन्हे आणि गुन्हेगार शोधण्यासाठी वापरात आलेल्या संगणक किंवा मेलवरून गुन्हेगाराचा आयपी अॅड्रेस (इंटरनेट प्रोटोकॉल अॅड्रेस) शोधला जातो. असा मेल कोणत्या सर्व्हरवरून आला, हे शोधले जाते. आयपी अॅड्रेसवरून वापरण्यात आलेला संगणक, त्याचा प्रकार, इंटरनेट स्पीड, सर्व्हरचे लोकेशन शोधून काढत गुन्हेगाराला शोधता येते. त्यामुळे आपला आयपी अॅड्रेस कोणाला कळू नयेत यासाठी डार्क वेबमंडळी विविध युक्त्या शोधून काढत असतात. टॉर ब्राऊझर ही त्यातलीच एक युक्ती आहे. 
 
TOR चा फुलफॉर्म आहे The Onion Router. याचं नाव थोडं मजेशीर आहे कारण त्याच्या मागचा अर्थ Onion म्हणजेच कांद्याशी जोडला गेलेला आहे. या ब्राऊझरमधून आपण सर्फींग केल्यास आयपी अॅड्रेसवर कांदयाची आवरणं असतात, तशी आवरणं तयार केली जातात ज्यामुळे तुमचा पत्ता कळूच शकत नाही. मीजेव्हा हा ब्राऊझर वापरून काम करायला सुरुवात केली तेव्हा माझा आयपी हा पॅरीस, बेल्जियम सारख्या देशातील असल्याचं दाखवत होतं.

टॉर सारख्या ब्राऊझरचा आम्हाला काय उपयोग, आमच्याकडे का आहे लपवण्यासारखं असा प्रश्न हमखास विचारला जातो. विषय तुमच्याकडे लपवण्यासारखं काय आहे हा नसून तुमच्या नकळत माहिती चोरली जातेय याचा आहे. तुम्ही काय करता, कुठे फिरता, कोणाबरोबर फिरता, खायला का आवडतं, पॉर्न बघता का? कोणत्या वेबसाईट जास्त पाहता, मेलचे पासवर्ड काय आहेत अशा असंख्य गोष्टी माहिती स्वरुपात जमवून तुम्हाला ब्लॅकमेल करता येऊ शकतं, तुम्हाला त्रास देता येऊ शकतो. नेटबँकींगसाठी तर टॉरसारखा ब्राऊझर वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यापैकी अनेकजण लपून छपून टोरेन्टद्वारे पिक्चर डाऊनलोड करत असतो. यासाठी टॉर हा अधिक फायदेशीर ठरू शकतो. टॉर ब्राऊझर डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर जितका प्रभावीपणे वापरता येतो तितका मोबाईलवर प्रभावीपणे वापरता येत नाही. सध्या हा ब्राऊझर फक्त अँड्राईडसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आयफोन वापरणाऱ्यांना हा ब्राऊझर वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला नाहीये.

Comments

Popular posts from this blog

शाळा (भाग2)

आमची शाळा मध्यमवर्गीयांची होती, यातही बरेच विद्यार्थी असे होते ज्यांचे पालक जीवतोड मेहनत करून मिळेल त्यातल्या पैशातून कसंही करून मुलाला शिकवायचंच या जिद्दीने मुलांना शिकवणारे होते. अशा मुलांना अगदी नाममात्र म्हणजे 5 किंवा 10 रूपये फी पण परवडायची नाही त्यांच्याकडून सहलीसाठी पैसे कुठून मागायचे हा पण एक मोठा प्रश्नच होता. पण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फारसा कोणी प्रयत्नच केला नाही. जवळपास दिड वर्षापूर्वी शाळेत आमच्याबरोबर असलेले जे-जे जमतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. एकमेकांची विचारपूस करत असताना प्रत्येकजण आता काय करतोय हे कळत होतं. दहावीपर्यंत नुसता उंडगत फिरणारा आनंद संचेती आता इंजनिअर झाला, फॉरेनला गेला, नापास झाल्होयामुळे आमच्या बरोबर आलेला आणि नंतर आमच्याच बरोबरचा झालेला अमित कदम स्व : तचं दुकान चालवतो (आणि ते ही अतिशय उत्तम पद्धतीने) सायन्स करून कॉलेजमधून बाहेर पडलेला निलेश पाटील केमिकल चा प्लॅन्ट एकट्याच्या जीवावर उभा करू शकतो. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त रस असलेला प्रीतम परब एक मल्टीनॅशनल बँकेत मोठ्या पदावर आहे. जयेश जोशी स्वतची इव्हेन्ट मॅनेज...

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...