Skip to main content

अखेर टेरारियम टीव्ही बंद पडला

 

हा टीव्ही असा होता जो घरातल्या ईडीयट बॉक्सपेक्षाही प्रेक्षकांना आवडला होता. फुकटात नेटफ्लिक्स, अमेझॉन, युट्यूब रेड सारख्यांच्या सिरीज , नवे जुने चांगल्या वाईट क्वालिटीचे सिनेमे दाखवणारे हे अॅप प्रचंड फेमस झालं होतं. हे अॅप बंद झाल्यानं मी तर निराश झालोच आहे, माझ्यासारखे आशिया खंडातील असंख्य प्रेक्षक निराश झालेत. 


साधारणपणे २-३ वर्ष झाली असतील मी माझ्या बहिणीकडे गेलो असताना आमच्या नव्या वेबसिरीज, नवे पिक्चर यावर गप्पा सुरू होत्या तेव्हा बहिणीने विचारलं की तू टेरारियम टीव्ही वापरतोस का? मी म्हटलं नाही  त्यानंतर माझी या अॅपशी खऱ्या अर्थाने ओळख झाली आणि पहिल्या नजरेतील प्रेमाप्रमाणे माझं अॅपवरील प्रेमही जुळलं.रिकाम्या वेळेत, डोकं विचार करून गंजलं असताना या अॅपने आधार दिला. या अॅपच्या आधारे मी असंख्य वेबसिरीज आणि सिनेमे पाहिले आहेत, ते डाऊनलोडही केले आहेत. त्यामुळे हे अॅप बंद होणं हा माझ्यासाठी एक धक्का नक्कीच होता. 

नेटफ्लिक्ससारख्या बड्या कंपन्यांनी त्यांच्या उद्योगावर परिणाम होत असल्याने टेरारियम टीव्ही आणि त्यासारख्या इतर अॅपविरूद्ध कारवाई करण्याचं ठरवलं होतं. करोडो रुपये खर्च करून आणि त्याही पेक्षा जास्त पैसे मिळणार असताना टेरारियम टीव्हीसारखी उपद्रवी अॅप त्यांचा धंदा तोडत होते. कोणत्याही व्यावसायिकाला ही गोष्ट पटू शकणार नाही. त्यामुळे पीटर चॅन ज्याचं टोपण नाव निट्रो झेनॉन असं आहे त्याने एके दिवशी घोषणा करून टाकली की टेरारियम टीव्हीचा गाशा गुंडाळतोय, आणि याबद्दल मला वाईट वाटतंय. 

टेरारियम टीव्ही बंद पडल्यानंतर ते अॅप वापरणाऱ्यांना नोटिफिकेशनच्या माध्यमातून काही सूचना यायला लागल्या, ज्या चिंताजनक आहेत. अॅप ताबडतोब अनइन्स्टॉल करा अन्यथा तुमची माहिती वापरली जाईल. अनेकांनी ताबडतोब पीटरला याबाबत विचारणा केली, यावर त्याने ही बाब खरी असल्याचं सांगितलं. पीटर म्हणाला की कोणतंही अॅप हे आय.पी अड्रेस ट्रॅक करत असतं, आणि तो साठवला जात असतो. जर मला सुरक्षा यंत्रणांनी हे आयपी अॅड्रेस विचारले तर मला ते द्यावे लागतील. त्याच्या या उत्तराने सध्या जाम खळबळ उडाली आहे. कारण त्याने हा उद्योग अॅप जेव्हा सुरू होतं तेव्हा पैसे कमावण्यासाठीही केला असावा असा अनेकांना संशय आहे. म्हणजेच अॅप सुरू असताना त्याने प्रेक्षकांची गोपनीय माहिती इच्छुकांना विकली असावी असा अंदाज आहे, असं केल्याशिवाय त्याला फुकटात हे अॅप चालवणं शक्य नाही असा  दावा केला जात आहे. 

टेरारियम टीव्ही बंद पडलाय मात्र त्याची जागा इतरांनी घ्यायला सुरूवात केली आहे. अशी कोणची ३ अॅप आहेत जी या अॅपला टक्कर देतायत, किंवा देऊ शकतायत ते पाहूयात



FreeFlix HQ
टेरारियम टीव्ही असताना या अॅपकडे फारसं लक्ष गेलं नव्हतं, मात्र आता हे अम जरा जास्त फॉर्मात आलं आहे.

Kodi

कोडी हा मिडीया प्लेअर होता जो नंतर टेरारियम टीव्हीला मनोरंजनाची रसद पुरवणारा मोठं माध्यम बनला होता. टेरारियम टीव्ही गेल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी कोडीकडे सगळी क्षमता आहे.

TeaTV

टेरारियम टीव्हीची जेव्हा सुरूवात झाली तेव्हाच टी-टीव्हीचीही सुरूवात झाली होती. मात्र टेरारियम टीव्ही जितका प्रसिद्ध झाला तितका टीचीव्ही प्रसिद्ध झाला नाही. टीटीव्हीने गेल्या काही महिन्यात बरीच सुधारणा केली असून त्याचा त्यांना आता फायदा होऊ शकतो.     

Comments

Popular posts from this blog

मती गुंग करणारे साहित्य वाचताना

  मी सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा मात्र मी मानत नाही. सारासार विचार करत असताना अनेक गोष्टींकडे आपण एकाच अंगाने किंवा दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र पृथ्वीवर माणूस उपराच सारखी पुसत्कं वाचल्यानंतर आपण ज्या गोष्टी बघतोय त्याला दुसरू बाजू असू शकत ज्याकडे आपण वेगळ्या नजरेने पाहिलंच नाही असं वाटायला लागतं. अशा पुस्तकांमधले बरेचसे तर्क मनाला पटतात मात्र मेंदू ते सहजासहजी स्वीकारायला तयार होत नाही. हिंदू धर्मामध्ये देवी-देवतांच्या गोष्टी, अख्यायिका, दंतकथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जातात. आमचं घर त्याला अपवाद नव्हतं. थोडा मोठा झालो तेव्हा कार्टुन्समधले सुपर ह्युमन्स आवडायला लागले. आणखी मोठा झाल्यावर हे सगळे सुपर ह्युमन्स आपल्या देवी-देवतांसारखेच आहेत असं जाणवायला लागलं. उदाहरणार्थ सुपरमॅन हा मला नेमही हनुमानासारखा वाटत आला आहे. भगवान शंकर हा आयर्न मॅनसारखा वाटत आला आहे. सुरेश नाडकर्णी यांचं पुस्तक साधारणपणे १०-१२ वर्षांपूर्वी वाचलं होतं, ते पुस्तक वाचल्यानंतर मी विचार करत असलेली गोष्ट   खरोखर असू शकते असं वाटायला लागलं म्हणजे, ज्यांना आपण देव समजतोय ते कद...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...

एका बादलीनं जग बदलेल

                                आत्तापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही. मग काय करायचं ?   हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते...