भाजपाचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालपरवा एक विधान केलं, ज्यात ते म्हाणाले की मी पण त्या "क्लिप्स" बघतो. त्यावर आलेल्या निषेधाच्या प्रतिक्रियांमध्ये शिवसेनेच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांचाही समावेश होता. मात्र त्यांच्या पक्षानं सध्या पिकल्या देठाचा नाही तर सुकल्या पानांचा विचार करणं अधिक गरजेचं आहे. याचा अर्थ साधा आहे, राज्यात दुष्काळ पडलाय त्याकडे शिवसेनेनं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अर्थात नीलम गोऱ्हे यांना मिडीया अटेंन्शन हवं असेल तर भाग वेगळा.
उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला, सुरूवातील मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे उस्मानाबादपासून दौरा सुरू करणार होते. मात्र असं बोललं जातं की तिथे जाण्यासाठी त्यांना खाजगी विमान मिळालं नाही. उस्मानाबादला गाडीनं जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र गाडीचा प्रवास नको म्हणून त्यांनी उस्मानाबादचा दौराच रद्द करून टाकला. अर्थात उद्धव ठाकरेंची सर्जरी झालेली आहे, त्यांना प्रवास झेपत नाही, मग असं असेल तर मग उस्मानाबादचं किंवा औरंगाबादचं प्रयोजन ठेवलंच कशाला असा प्रश्न पडू शकतो. शिवसेनेचे बहुतांश कार्यक्रम मातोश्री किंवा शिवसेना भवनात होतात, तिथेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बोलावून मदत देता आली असती.
अभिनेता मरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर दोघेजण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुुटुंबियांना मदत देण्याचं काम करतायत. तर दुसरीकडे सरकार देखील दुष्काळाशी लढण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडे अनेकजण मदतीचे धनादेश सुपूर्द करतायत. तर ज्यांना हा मार्ग अवलंबायचा नाही ते नाना आणि मकरंद यांच्याकडे मदतीचा धनादेश सोपवतायत. मग शिवसेना वेगळी जाऊन मदत का करतेय या प्रश्नाचं उत्तर मिळेनासं झालंय. शिवसेनेला शेतकऱ्यांना मदतच करायी होती तर मग त्यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे का दिला नाही ? उद्धव ठाकरेंचा ते ज्या सत्तेचा भाग आहेत त्या सरकारवर भरोसा नाही का ?
उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनाच दुष्काळाचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला. राजकारणात असे आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. पण मग उद्धव ठाकरे वेगळं असं काय करतायत ? भाजपानं
आपल्याला दूर ढकललं किंवा आपणच भाजपाला हाकलून दिलं असं दाखवायचं असेल तर मग आपली व्होटबँक तयार व्हायला नको का ? या चिंतेने पछाडलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्वत:च मराठवाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ते औरंगाबाद पलिकडे मराठवाड्यात फिरकलेच नाहीत.

उद्धव ठाकरे जर उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर ते मातोश्रीवर बसून किंवा सेना भवनात बसूनच राज्याचा
कारभार हाकणार आहेत का ? तब्येत बरी नसली तर ते राज्याच्या विविध भागांचे दौरे करणार नाहीत का ? असे प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे 'राजकारण करू नका' असा सल्ला देणाऱ्या उद्धव ठाकरेंनीही या मुद्दाचं राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करावी हे अपेक्षित आहे.

Comments
Post a Comment