बातम्या करताना अनेक लोकांशी संबंध येतो त्यावेळी बोलत असताना हा शब्द हमखास ऐकायला मिळतो, भाई तो एक नंबरचा चमडी आहे हां..अनेकदा राजकारणी, अधिकारी वकील, पत्रकार, डॉक्टर हे देखील या चमडीगिरीत अडकलेले बघायला मिळतात.
यातले अनेक जण सुरूवातीला वासू असतात, वास काढत फिरत असतात. एखादी सुंदर महिला दिसली की यांचं काम सुरू होतं. तिला फिरवण्यासाठी ते काय पण करायला तयार असतात, अर्थात याला वयोमर्यादा अजिबात नसते, 60 वर्ष पूर्ण केलेले म्हातारे पण तरूण पोरींना, महिलांना घेऊन फिरताना बघायला मिळतात. या सगळ्यांचा शेवट हा एकतर त्या महिलेच्या हातून मार खाण्यात होतो, एखाद्या लफड्यात अडकण्यात होतो, किंवा बायकोच्या हातचा सगळ्यांच्या समोर मार खाण्यात होतो.
हे चित्र प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलेलं आहे |
तरीही यातल्या काहींची हौस फार दांडगी असते. मार खाल्ला, लफडी झाली तरी हे चमडी पब्लिक गरजू महिलेला खांदा द्यायला तयारच असतात. तनू वेडस मनू-2 मध्ये जिम्मी शेरगिल त्यातल्याच एका कॅरेक्क्टरला प्रश्न विचारतो "तू कौन, (तो समोरचा उत्तर देतो ) भैय्या हम कंधा...आपने छोड दिया तो डॉक्टरसाब ने दे दिया, उन्होने छोडा तो हमने दे दिया, हम छोड देंगे ता आप दे देना" असे अनेक खांदे आपल्या आजूबाजूला सतत फिरत असतात.
याचा फायदा काही महिला घेतात आणि स्वत:चा स्वार्थ साधतात. महिला ऑफिसमधलीच असेल तर अशावेळी अनेकदा पुरूष कर्मचा-यांवर प्रचंड अन्याय झालेला बघायला मिळतो, पण बोलायचं कोणाकडे ? बॉसकडे गेलो तर तो बॉस स्वत: खांदा देणारा असतो, किंवा खांदा देणारा बॉसचा गोटी तरी असतो. इथे हक्क-बिक्क मागून काही चालत नाही, असं काही झालं तर ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढलं जाण्याची शक्यता असते.
काही प्रकरणं कानावर येतात, त्यातलं एक प्रकरण असं आहे की एका सदगृहस्थाचं लग्न झालेलं होतं. तरीही त्यांना एक मुलगी आवडायला लागली. ते तिच्याबरोबर व्यवस्थित फिरायला वैगरे लागले. मग कामानिमित्त टूर्स पण व्हायला लागल्या, काही दिवसांनी भाऊ घरी कमी आणि टूर्सवरच जास्त दिसायला लागले. बायकोला कळालं की आपला नवरा असले धंदे करतोय.त्याला धडा कसा शिकवायचा असा विचार करत असताना त्या बायकोलाही खांदा मिळाला, मग काय आनंदी आनंद झाला. आज हे दोघेही नवरा-बायको आपलं नातं नावापुरता टीकवून आहेत, कारण समाजात हे नातं टिकवणं गरजेचं असतं.
हे चित्र प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलेलं आहे |
असे अनेक प्रसंग आहे जे बघितलेले आहेत, माहिती आहेत. शीना बोरा प्रकरणातील इंद्राणीनं देखील असे बरेचसे खांदे शोधले असतील त्यातून जी गुंतागुंत निर्माण झाली ती जगासमोर आहेच.
Comments
Post a Comment