Skip to main content

Posts

Showing posts from August, 2015

चमडी डॉट कॉम...

शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीची ज्ञात लग्न अज्ञात लफडी यामुळे ती बातमी अनेकांनी फार चवीनं दाखवली. हा सगळा प्रकार होता त्याला बोली भाषेत चमडीगिरी म्हणतात,   या चमडीगिरीमध्ये अडकलेल्या अनेकांचे हाल आज इंद्राणीच्या आजी माजी पती, तिच्यावर प्रेम करणा-यांचे झालेत तसेच होतात. बातम्या करताना अनेक लोकांशी संबंध येतो त्यावेळी बोलत असताना हा शब्द हमखास ऐकायला मिळतो, भाई तो एक नंबरचा चमडी आहे हां..अनेकदा राजकारणी, अधिकारी वकील, पत्रकार, डॉक्टर  हे देखील या चमडीगिरीत अडकलेले बघायला मिळतात.  यातले अनेक जण सुरूवातीला वासू असतात, वास काढत फिरत असतात. एखादी सुंदर महिला दिसली की यांचं काम सुरू होतं. तिला फिरवण्यासाठी ते काय पण करायला तयार असतात, अर्थात याला वयोमर्यादा अजिबात नसते, 60 वर्ष पूर्ण केलेले म्हातारे पण तरूण पोरींना, महिलांना घेऊन फिरताना बघायला मिळतात.  या सगळ्यांचा शेवट हा एकतर त्या महिलेच्या हातून मार खाण्यात होतो, एखाद्या लफड्यात अडकण्यात होतो, किंवा बायकोच्या हातचा सगळ्यांच्या समोर मार खाण्यात होतो.  हे चित्र प्रातिनिधिक स्वरूपात वापरण्यात आलेलं आहे त

कल्याण-डोंबिवलीचा कंडोम केला

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. ५ वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुका मी जवळून बघितल्या होत्या. राज ठाकरेंच्या मनसेचा उदय, त्यावेळी संघाचा कमी झालेला पगडा, सत्ताधा-यांच्या विरोधात असलेली नाराजी, त्याकाळी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेले हरत-हेचे प्रयत्न या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. गेल्या ५ वर्षात या दोन शहरांची परिस्थिती काय बदलली ? हा प्रश्न माझ्या प्रमाणे प्रत्येक कल्याण-डोंबिवलीकराला पडलेला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नावाचा शॉर्ट फॉर्म क.डों.म.पा असा केला जातो. गंमतीनं किंवा उपहासानं त्याला कंडोमपा म्हटलं जातं. मात्र ही गंमत करताना लाजा वाटायला पाहीजेत. मराठी माणूस जो गिरगांवातून, दादरमधून किंवा राज्याच्या कुठल्याही अन्य भागातून बाहेर पडला, त्याला सामावून घेत हे शहर उदयाला आलं. किमान राज्यातील एखाद्या शहराचा इतक्या वाईट पध्दतीनं उल्लेख करणं योग्य वाटत नाही. दुर्दैव हे आहे की राजकारण्यांनी शहराला कंडोमसारखंच वापरलं. सत्ता आहे तोपर्यंत घासत राहीले, गरज संपल्यानंतर फेकून दिलं. शहरातले लोकं फार सहनशील ज्यामु

जीवनदायी व्हॉटसअप योजना

व्हॉटसअप चांगलं का वाईट याबद्दल अनेकदा ऊलटसुलट चर्चा ऐकायला मिळते. वाईट गोष्टींबद्दल जास्तच जोरात चर्चा होते. तंत्रज्ञानाचा चांगला फायदा होऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणून मी हा ब्लॉग लिहीतोय. माझा शाळेतला मित्र आहे दत्तात्रय मेटकरी म्हणून, त्याचा फोन आला त्याच्या परिचयाच्या एका माणसाला माझ्याशी बोलायचं होतं, मी त्याला सांगितलं की फोन करायला सांग. संतोष शिंदे नावाच्या माणसाचा मला फोन आला. संतोषचं ६ दिवसांचं बाळ होतं ज्यावर अवघड आणि महागडी शस्त्रक्रिया करायची होती.  त्या बाळाला वाडीया हॉस्पीटलमध्ये आणलं होतं.  मला संतोष शिंदेनं सांगितलं की वाडीयावाले शस्त्रक्रिया करायला तयार नाही त्याला दुस-या हॉस्पीटलमध्ये न्यावं लागेल. मला त्याने त्याच्या बाळाचा फोटो पाठवला होता. तो फोटो आणि व्हॉटसअपचा एक मेसेज तयार केला आणि अनेक ग्रुपमध्ये पोस्ट केला. या ग्रुप्समध्ये पत्रकार होते, मंत्र्यांचे पीए होते, राजकारणी अशी अनेक माणसं होतं. त्यातल्या काही जणांनी संतोषशी संपर्कही साधला. अमेय खोपकरचा मला मेसेज वाचल्यानंतर फोन आला हे खरं आहे का (कारण मदत करा असं सागून फसवणारे अनेक जण आहेत) मी म्हटलं ही केस खरी

एका बादलीनं जग बदलेल

                                आत्तापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही. मग काय करायचं ?   हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते. अशी एक चळवळ सुरू होणं गरजेची आहे, ही चळवळ सोशल नेटवर्कींग साईटवर किंवा व्हॉटसअपवर