Skip to main content

सीमोल्लंघन

साचलेपण कधीच चांगल नसत...म्हणून कधी कधी भावनांच्या आहारी ना जाता मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागतो. असाच निर्णय मी स्टार माझा सोडताना घेतला, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून रस्त्याचा शेवट शोधण्यापेक्षा मीच थांबायच ठरवल. सुरवात मराठी पत्रकराना घडवणाऱ्या ई टी व्ही मराठी पासून केल्या नंतर अस वाटल ही नव्ह्त की प्रवास करत इथपर्यंत येईन.

राजीनामा देऊन शेवटच्या दिवशी काम संपेपर्यंत जबरदस्त दडपण आल होत. एक तर काही लोकाना मी का जातोय आणि मला थांबवत का नाहीत हा प्रश्न पडला होता. त्यांच्या प्रमाणे तो मला ही सतावत होता, पण माझा निर्णय हा नक्की असल्याने त्याकडे मी जस्ता लक्ष दिला नाही. जाता जाता स्टार माझा चे संपादक राजीव खांडेकरानी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना सांगितलेला एक वाक्य मला कायम आठवणीत राहिल...पिच कोणतीही असो स्कोर करण हे तुझ काम आहे. त्यानी सांगितलेल वाक्य लक्षात ठेवत बाद न होता नवी इनिंग सुरु करण्याचा निर्णय पक्का केला. हिंदी वहिन्या आणि त्यासाठी काम करणार्या मराठी पत्रकारांमधे आता माझाही समावेश झाला.

ई.टी.व्ही चे राजेंद्र साठे आणि स्टार माझा चे राजीव खांडेकर ही माणस दिसायला जरी साधी असली तरी ती किती ग्रेट आहेत हे त्यांच्या बरोबर काम करताना जाणवत. आता साथ लाभणार आहे ती रविन्द्र आम्बेकर यांची. खर तर ई.टी.व्ही मधे इनटर्न शिप करतानाच मी रविच्या कामाची पद्धत बघितली होती, जे काम करायच ते मोठच करायच हा तेव्हापासून त्याचा खाक्या होता...पुन्हा त्याच्या हाताखाली काम करायला मिळाल्याने बर वाटतय. आता नव्या कप्तानाच्या हाताखाली नवी इनिंग सुरु करतोय. भेटूच पुन्हा...

Comments

Popular posts from this blog

पोलीस स्टेशन असावं तर असं (Brooklyn Nine Nine)

  नेटफ्लिक्सने विविध प्रकारच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या. वेगळे प्रयोगही करून पाहिले. इंग्रजी मालिका किंवा चित्रपटातील पोलीस म्हणजे मारहाण, अॅक्शनपट असं समीकरण रूढ झालंय. पोलीस अकॅडेमी सारख्या काही चित्रपटांनी हा ट्रेंड नाही म्हटलं तरी बदलण्याचा प्रयत्न केला मात्र मालिकांमध्ये हा प्रयोग फार झाला नव्हता. ‘ ब्रुकलीन नाईन नाईन ’ ने हा प्रयोग करून बघितलाय. आचरटांचा बाजार पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवला तर काय होईल हे पाहायचं असेल तर ब्रुकलीन नाईन नाईन ही सिरीज बघितलीच पाहिजे. जॅक पेराल्टा त्याची गर्लफ्रेंड एमी सँटीआगो, रोझा डिआझ, आचरटांचा बादशहा कॅटेगरीत मोडणारा चार्ल्स बॉयल, अत्यंत चाप्टर असलेली जिना लेनेटी, या सगळ्यांचा सार्जंट टेरी आणि सगळ्या ब्रुकलीनचा कॅप्टन म्हणजे रेमंड होल्ट ही या मालिकेतील मुख्य पात्र आहेत. तोंडी लावायला हिचकॉक आणि स्कली ही अतिविचित्र माणसंही दाखवण्यात आली आहे.  यातला मुख्य अभिनेता असलेला जॅक पेराल्टा हा हायहार्ड चित्रपटातील ब्रुस विलीसचा कट्टर भक्त असतो. त्याच्याप्रमाणे गुंडांना, दहशतवाद्यांना पकडायचं असं त्याचं स्वप्न असतं. त्याच्या...

दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बलात्काराचे प्रमाण वाढलंय का ?

  एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा.   गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे.  बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...

एका बादलीनं जग बदलेल

                                आत्तापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत होती ती म्हणजे पाण्याचं संकट हे दरवर्षी मोठं बनत जाणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात येतायत, भविष्यातही हे प्रयोग होत राहतील. जलशिवार योजना असेल किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी आपलं नाव अमर व्हावं यासाठी पृथ्वी बंधारे बांधण्याची सुरू केलेली योजना असेल, प्रयत्न सुरू आहेत. पण जर पाऊसच पडला नाही तर कोणतीही योजना यशस्वी होऊच शकत नाही. मग काय करायचं ?   हातावर हात धरून मांडी घालून पाणी समस्या किती भीषण आहे हो अशी चर्चा करत बसायची ? ज्यांना काहीच करायचं नाही ते काहीच करणार नाही, पण ज्यांना खरोखर काहीतरी करायचंय ते नक्की करू शकतील. वारकरी संप्रदायानं कुटुंब कबिला असणारा-यांना आध्यात्म कळू शकतं, आणि देवापर्यंत पोचता येऊ शकतं हा मार्ग दाखवून दिला. चळवळीच्या बाबतीतही तसंच म्हणायला हरकत नाही. काही चळवळ दरवेळी रस्त्यावर उतरून करायला लागते असं नाही, करायची असेल तर ती कशीही करता येते...