एक ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये जबरदस्त पसरत चाललाय. दाक्षिणात्य सिनेमे हिंदीत आणण्याचा हा ट्रेंड माझ्यामते १० वर्षांपूर्वी सुरु झाला असावा. तो आता इतका वाढलाय की आता तमिळ, तेलुगू,कन्नड, मल्याळम सिनेमे आता हिंदीतही प्रदर्शित व्हायला लागले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांचा राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सातत्याने दबदबा असायचा. गंभीर किंवा चांगल्या चित्रपटांसोबत मसाला चित्रपटही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बनवत आली आहे. या मसाला चित्रपटांमधील अतिरेकी गोषअटींमुळे गेल्या काही वर्षाच हिंसाचार आणि खासकरून बलात्काराचे प्रमाण वाढायला लागलंय असं माझं स्पष्ट मत आहे. बातमीच्या क्षेत्रात असल्याने विविध घटना सामान्य माणसांच्या आधी आमच्या कानावर पडत असतात. मग तो खून,दरोडा असा किंवा बलात्कार. देशामध्ये पत्रकारिता वाढत चालली आहे मात्र तिची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. बलात्काराची घटना इतक्या वाढल्या आहेत की देशात महिला मुली सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडायचाही बंद झाला आहे, कारण त्या सुरक्षित नाही याचं उत्तर मिळालेलं आहे. या परिस्थितीला कदाचित एक सामाजिक आयाम असू शकतो असं...
भारतात इतिहास हा फक्त पुस्तकात अभ्यासण्यासाठी निर्माण झालेली गोष्ट आहे असं बहुसंख्य मंडळींना वाटतं. परदेशात ज्या पद्धतीने इतिहासाकडे बघितलं जातं, त्यावर संशोधन केलं जातं त्यानुसार उत्खनन केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चर्चा केली जाते ते आपल्या देशात फारसं बघायला मिळत नाही. मोगल साम्राज्य, शिवाजी महाराज आणि त्यानंतर थेट देशाचा स्वातंत्र्य इतिहास हेच शाळेपासून कॉलेजपर्यंत विद्यार्थ्यांना लक्षात राहतील असे इतिहासातील भाग आहेत. सिंध संस्कृती, गुप्त, सातवाहन, मौर्य, चालुक्य राज्यकाळ हे कोणाला फारसं आठवत नाही. सातवाहन साम्राज्याचं ऐश्वर्य दाखवणारं आणि थेट रोमशी व्यापारी संबंध असलेलं महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यामधलं तेर गाव पाहण्यासाठी विदेशातील मंडळी येऊन जातात मात्र आपल्या राज्यातील बहुसंख्य लोकांना हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या किती महत्वाचं आहे याची पुसटशीही कल्पना नाहीये. महाराष्ट्र इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतीतीभोवती सातत्याने फिरत आला आहे. या महान राजाचं कर्तृत्वच तसं होतं. मात्र या लोक कल्याणकारी राजाच्या आधी महाराष्ट्रात नेमकं काय घडत होत...