ईटीव्हीत जगणं सुसह्य करणा-या काही निवडक गोष्टी होत्या. त्यामध्ये खाणं ही सगळ्यात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट होती. हैद्राबादची ओळख ही तिथल्या बिर्याणी मुळे आहे. आम्ही ज्या ठिकाणी रहायचो (दिलसुखनगर भागात) तिथे वडापावच्या गाड्यांप्रमाणे बिर्याणीची छोटी दुकानं असायची. फक्त दिलसुखनगरच नाही तर जवळपास संपूर्ण हैद्राबादमध्ये अशा पद्धतीची दुकानं दिसून यायची. एका बिर्याणीमध्ये दोन जणांचं काम भागायचं. 70 ते 80 रूपयांमध्ये एका वेळचं पूर्ण जेवण बिर्याणीमुळे होऊन जायचं. अमित जोशीला फिरण्याची बरीच आवड होती. एकदा अमित एकटाच सिकंदराबाद भागात गेला होता तिथं “ अल्फा ” नावाच्या हॉटेलमधली बिर्याणी त्याला एवढी आवडली की दोन माणसांची बिर्याणी त्याने एक ब्रेक घेऊन संपवून टाकली. (बिर्याणी एका माणसानं संपवणं ही अशक्यप्राय गोष्ट होती) सांगायचं तात्पर्य की बिर्याणीची चव ही आयुष्यभर स्मरणात राहील अशी होती. सकाळी नाश्त्यासाठी पुन्हा छोट्या दुकानांचा आधार घ्यावा लागयचा. रस्त्याच्या कडेला अनेक स्नॅक्स कॉर्नर दियायचे. इथे इडली, डोसा, पासून टॉमेटो भात बिसिबेळी हुळ्ळीअन्ना( मला या पदार्थाचं नाव ऐकूनच तो न खाण्याच...