ई टीव्ही सोडलं तरी त्या चॅनलशी असलेली जवळीक ही आयुष्यभर आहे तशीच राहील...अनेक बरे वाईट प्रसंग या चॅनलमध्ये काम करताना अनुभवायला मिळाले. अनुभवाची पहिली पायरी म्हणून ज्या संस्थेची ओळख आहे त्या संस्थेत काम करताना नेहमीच काही ना काही शिकून माणसं बाहेर पडली आहेत. मी ही त्याला अपवाद नव्हतो...या संस्थेशी असलेल्या जवळकीमुळेच सोबत काम करणारे कोणी भेटले तर मस्त धमाल येते. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना ईटीव्हीतला एक जुना मित्र सचिन गडहिरे वारंवार भेटत असतो. अर्थसंकल्पाच्या दिवशी आम्ही योगायोगाने एकत्र बसलो होतो. तेव्हा बोलता बोलता तो सहज बोलून गेला की ईटीव्हीत होती तशी मजा आता काही येत नाही (काही लोकं 8 तास सरकारी ड्युटी मुळे खूश असायची) त्याच्या बोलण्यातला अर्थ थोडा वेगळा होता कारण आम्ही एकत्र हैद्राबाद आणि मुंबई दोन्हीकडे काम केलं होतं. खासकरून आशिष चांदोरकर आणि सचिन गडहिरेला वरिष्ठांना उलट बोललण्यामुळे सलग काही आठवडे नाईट शिफ्ट देण्यात आली होती, या दोघांबरोबर मी आणि सचिन फुलपगारे (या दोघांचे हेल्पर म्हणून) आमचीही डुयटी लावण्यात आली होती. आमच्या चौघांमध्ये नेहमीच कॉर्डीनेशन जबरदस्त होतं ज्याम...