भाजपाचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालपरवा एक विधान केलं, ज्यात ते म्हाणाले की मी पण त्या "क्लिप्स" बघतो. त्यावर आलेल्या निषेधाच्या प्रतिक्रियांमध्ये शिवसेनेच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांचाही समावेश होता. मात्र त्यांच्या पक्षानं सध्या पिकल्या देठाचा नाही तर सुकल्या पानांचा विचार करणं अधिक गरजेचं आहे. याचा अर्थ साधा आहे, राज्यात दुष्काळ पडलाय त्याकडे शिवसेनेनं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अर्थात नीलम गोऱ्हे यांना मिडीया अटेंन्शन हवं असेल तर भाग वेगळा. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला, सुरूवातील मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे हे उस्मानाबादपासून दौरा सुरू करणार होते. मात्र असं बोललं जातं की तिथे जाण्यासाठी त्यांना खाजगी विमान मिळालं नाही. उस्मानाबादला गाडीनं जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र गाडीचा प्रवास नको म्हणून त्यांनी उस्मानाबादचा दौराच रद्द करून टाकला. अर्थात उद्धव ठाकरेंची सर्जरी झालेली आहे, त्यांना प्रवास झेपत नाही, मग असं असेल तर मग उस्मानाबादचं किंवा औरंगाबादचं प्रयोजन ठेवलंच कशाला असा प्रश्न पडू शकतो. शिवसेन...