पुन्हा मराठीच का ? राष्ट्रीय चॅनलमध्ये गेलेला मराठी पत्रकार पुन्हा मराठीकडे वळला तर हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र गेल्या काही वर्षात बदललेली परिस्थिती पाहता या प्रश्नाचं उत्तर मराठी चॅनल्स ना मिलणारं ग्लॅमर हे उत्तर असू शकतं. माझी सुरवातच मराठी चॅनलपासून झाली, निर्विवादपणे मराठी न्यूज चॅनल्स चा बादशहा म्हणूव ओळखल्या गेलेल्या ईटीव्ही मराठीपासून कारकिर्द सुरू करत असताना नॅशनल हिंदी चॅनल्स ग्लॅमर अनेकांना मी खुणावताना पाहीलं होतं. ही परिस्थिती ख-या अर्थानं बदलली 24 तास बातम्या देणा-या मराठी न्यूज चॅनल्सनी . स्टारमाझा, आय.बी.एन.लोकमत आणि झी24 तास ने ख-या अर्थानं मराठी बातम्या पाहणा-या दर्शकाला वेगळंपण जाणवून देण्याचं काम केलं. मात्र अजूनही मराठी न्यूज चॅनल्स पौगंडावस्थेत आहेत आणि त्यांना करण्यासारखं बरंच काही आहे. मात्र 24 तास बातम्या देणा-या या न्यूज चॅनल्सनी ईटीव्ही न्यूज ची पोकळी कधीच जाणवू दिली नाही. साधरणपणे 2002 नंतर हिंदी न्यूज चॅनेल्समध्ये सुरू झालेली स्पर्धा ही आता मराठी न्यूज चॅनेल्समध्ये बघायला मिळत आहे. वेगवान बातम्या, चांगल्या बातम्या तसंच हिंदी चॅनेल्सचा प्...