साचलेपण कधीच चांगल नसत...म्हणून कधी कधी भावनांच्या आहारी ना जाता मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागतो. असाच निर्णय मी स्टार माझा सोडताना घेतला, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून रस्त्याचा शेवट शोधण्यापेक्षा मीच थांबायच ठरवल. सुरवात मराठी पत्रकराना घडवणाऱ्या ई टी व्ही मराठी पासून केल्या नंतर अस वाटल ही नव्ह्त की प्रवास करत इथपर्यंत येईन. राजीनामा देऊन शेवटच्या दिवशी काम संपेपर्यंत जबरदस्त दडपण आल होत. एक तर काही लोकाना मी का जातोय आणि मला थांबवत का नाहीत हा प्रश्न पडला होता. त्यांच्या प्रमाणे तो मला ही सतावत होता, पण माझा निर्णय हा नक्की असल्याने त्याकडे मी जस्ता लक्ष दिला नाही. जाता जाता स्टार माझा चे संपादक राजीव खांडेकरानी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना सांगितलेला एक वाक्य मला कायम आठवणीत राहिल...पिच कोणतीही असो स्कोर करण हे तुझ काम आहे. त्यानी सांगितलेल वाक्य लक्षात ठेवत बाद न होता नवी इनिंग सुरु करण्याचा निर्णय पक्का केला. हिंदी वहिन्या आणि त्यासाठी काम करणार्या मराठी पत्रकारांमधे आता माझाही समावेश झाला. ...