Skip to main content

Posts

Angriya Cruise थोडे पैसे साठवा पण हा अनुभव एकदा घ्याच!

  मी कोकणातला असल्याने बोटीने कोकणात जाणाऱ्यांचे हाल ऐकून होतो. माझे आजोबा आणि त्यांचा मोठा भाऊ बोटीने कोकणात गेलेही आहेत आणि मुंबईलाही आलेत. बराच मोठा प्रवास , कडक ऊन , खचाखच गर्दी या सगळ्या दिव्यातून प्रवास करत ते कोकणात जायचे. कोकण सेवक आणि कोकण शक्ती या दोन बोटींनी हा प्रवास व्हायचा , मात्र त्या बंद पडल्याने आपल्याला बोटीने कधी कोकणात जाता आलं नाही , याची खंत सतत मनात होती. हे दु:ख पूर्णपणे नाही पण काही अंशी दूर करता आलं ते आंग्रिया या नव्याने सुरू झालेल्या क्रूझ सेवेमुळे. सुख यासाठी आहे कारण कोकणातील समुद्रसंपदा जवळून पाहण्याची संधी या क्रूझमुळे मिळणार आहे , दु:ख यासाठी आहे कारण ही क्रूझ रत्नागिरी , सिंधुदुर्ग , मालवण , वेंगुर्ले अशी कुठेही न थांबता थेट गोव्यात जाणार आहे. बस , ट्रेन , विमान या तिन्ही मार्गांनी प्रवास केलेल्या माझ्यासारख्या माणसाला बोटीने लांबचा प्रवास करणं हे स्वप्न होतं. बातम्यांसाठी मी कोणतीही सुरक्षा नसलेल्या मासेमारांच्या बोटीतून प्रवास केला आहे , मात्र मोठ्या बोटीतून प्रवास करता आला नव्हता. त्यामुळे आंग्रिया क्रूझ केव्हा सुरू होतेय याव...